TRENDING:

3 वर्षांपासून आमंत्रण मिळतंय... चला हवा येऊ द्या गाजवून सागर कारंडेची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री

Last Updated:

चला हवा येऊ द्या गाजवणाऱ्या सागर कारंडेनं बिग बॉस मराठी 6 मध्ये एन्ट्री केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
चला हवा येऊ द्या हा महाराष्ट्राचा फेव्हरेट शो गाजवून अभिनेता, कॉमेडी किंग सागर कारंडे याची Bigg Boss Marathi 6 मध्ये दमदार एन्ट्री झाली आहे. गेली अनेक दिवस त्याच्या नावाची चर्चा. सागर कारंडे घरात जाणारा दुसरा स्पर्धक ठरला आहे.  "तब्बल 3 वर्षांपासून मला बिग बॉसचं आमंत्रण येत होतं पण यावर्षी म्हटलं जाऊन बघू", असं म्हणत सागर कारंडेनं घरात एन्ट्री केली आहे.
News18
News18
advertisement

बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना सागर कारंडे त्याच्या खास स्टाइलमध्ये दिसला. "मी काही ठरवून आलो नाहीये. क्रिकेटच्या मॅचसारखं खेळणार. बाऊंसर आला तरी सिक्स मारणार, उत्तम आला तरी सिक्स मारणार", असं तो म्हणाला. रितेश देशमुखनं देखील सागर कारंडेला शुभेच्छा दिल्या.

सागर कारंडे गेली अनेक वर्ष मराठी रंगभूमी, मालिका आणि सिनेसृष्टीतील मेहनती कलाकार म्हणून ओळखला जातो. याच मेहनतीवर विश्वास असल्याचंही त्यानं ठामपणे सांगितलं. "मेहनतीचं दार मी कधीच सोडलेलं नाही. मी मेहनत करणार. जे मेहनतीचं असतं ते कायम आपल्या सोबत राहतं", असं म्हणत त्याने घरात एन्ट्री घेतली.

advertisement

झाडू, बादली घेऊन सागर कारंडेला बिग बॉसच्या घरात पाठवलं. Bigg Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडेची एन्ट्री प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेची ठरणार आहे. स्पष्ट बोलणं, विनोदबुद्धी, अनुभव आणि मेहनतीचा पाया यामुळे तो घरात कसा खेळतो, कोणते नवे वाद, मैत्री आणि डावपेच रंगतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, रविवारी शेवगा आणि गुळाला किती मिळाला दर?
सर्व पहा

अभिनेत्री दिपाली सय्यद ही बिग बॉस मराठी 6 मध्ये जाणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. घरात जाताच दिपाली आणि सागर कारंडे यांनी एकमेकांना पाहून आनंद व्यक्त केला. दोघांनी एकमेकांना मिठी मारली.

मराठी बातम्या/मनोरंजन/
3 वर्षांपासून आमंत्रण मिळतंय... चला हवा येऊ द्या गाजवून सागर कारंडेची Bigg Boss Marathi 6 मध्ये एन्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल