'बिग बॉस मराठी'मध्ये कोण होणार सहभागी?
अभिजीत मोरे या रिलस्टारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतोय,"रितेश भाऊंनी 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनची घोषणा केली आहे. लवकरच आपला 'मराठी बिग बॉस' चालू होणार आहे. याच 'बिग बॉस'बद्दल मला तुम्हाला एक गुडन्यूज द्यायची आहे. खूप दिवसांपासून हे सिक्रेट होतं. पण आता मी तुम्हाला सांगू शकतो. कारण आता या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा झाली आहे. होय मी जातोय 'बिग बॉस मराठी सीझन 6'मध्ये. मी तुम्हाला अजिबात खोटं सांगत नाही. जेव्हा इंस्टा, युट्यूबचा प्रवास सुरू केला होता तेव्हा कधीच वाटलं नव्हतं की मला 'बिग बॉस' सारख्या प्लॅटफॉर्मपर्यंत जाण्याची संधी मिळेल. हे सगळं शक्य झालं आहे त्याचं कारण तुम्ही आहात. तुम्ही मला स्टार्ट टू एन्डं खूप सपोर्ट केला आहे. एवढं प्रेम दिलं त्यासाठी खरंच धन्यवाद. पण आधी मला थोडी भीती वाटत होती".
advertisement
अभिजीत पुढे म्हणाला,"पण तुम्ही सर्वांनी कमेंट्समध्ये एवढा सपोर्ट केला. कितीकरी वेळा मला बोललात की 'बिग बॉस'मध्ये तू जायला हवं. म्हणून मग मी म्हटलं की चला एकदा प्रयत्न करुन पाहू. मी येतोय जर्मनीवरुन भारतात फक्त आपल्या 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनमध्ये सहभाही होण्यासाठी. पण आता आपल्याला दुप्पट मेहनत करायची आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात गेल्यानंतर तुमच्या वोट्सची मला खरंच गरज लागेल. तुमचं एक वोट मला 'बिग बॉस'च्या प्रवासात खूप पुढे घेऊन जाईल. तुमचं वोट मी वाया जाऊ देणार नाही हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. तुमचं मी फुल ऑन मनोरंजन करेल. याची खात्री देतो. जसं 'बाहुबली'मध्ये त्याची आई बोलते ना 'मेरा वचन ही है शासन' तसंच मीपण तुम्हाला वचन देतो 'मेरा वचन ही है शासन'.
अभिजीत पुढे झोपेतून उठतो आणि हे सगळं स्वप्न असल्याचं त्याच्या आणि चाहत्यांच्या लक्षात येतं. त्यानंतर अभिजीत पुढे म्हणतो,"जाऊद्या. बिग बॉस मध्ये जे आहेत त्यांना तरी पाठिंबा द्या". अभिजीत मोरे 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार असल्याने त्याचे चाहते आनंदी झाले होते. पण आता हे त्याचं स्वप्न असल्याने चाहते नाराज झाले आहेत.
