advertisement

Krushi Market: मका दर घसरलेलेच, सोयाबीन आणि कांद्याची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर

Last Updated:

2 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.

+
News18

News18

सांगली : मंगळवार, दिनांक 2 डिसेंबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, कांदा व मक्याची आवक आणि भाव पाहू.
मका दराची घसरगुंडी कायम
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 24 हजार, 824 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 13 हजार, 813 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1175 ते जास्तीत जास्त 1944 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 303 क्विंटल मक्यास सर्वसाधारण 3250 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख, 15 हजार, 569 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 41 हजार, 326 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 323 ते 1777 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1000 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1875 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
सोयाबीनच्या दरात चढ-उतार
राज्याच्या मार्केटमध्ये 32 हजार, 544 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. लातूर मार्केटमध्ये 9 हजार, 229 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3943 ते 4590 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नांदेड मार्केटमध्ये आवक झालेल्या 59 क्विंटल पिवळ्या सोयाबीनला सर्वसाधारण 4500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market: मका दर घसरलेलेच, सोयाबीन आणि कांद्याची आज काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement