‘बिग बॉस ओटीटी विजेती’ दिव्या अग्रवालचं काही दिवसांपूर्वी टीव्ही अभिनेता वरुण सूदसोबत ब्रेकअप केलं होतं. या दोघांच्या ब्रेकअपनंतर चाहते प्रचंड नाराज झाले होते. पण ब्रेकअप झाल्यानंतर काही काळातच दिव्याने मराठी बिझनेसमन सोबत एंगेजमेंट केली होती. सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. त्यानंतर ती कधी लग्न करतेय याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. आता दिव्याचे नववधूच्या वेषातील काही फोटो समोर आले आहेत. तिने स्वतः हे फोटो शेअर केले आहेत. यावरून दिव्यानं गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
advertisement
वयाच्या पन्नाशीत 19 वर्ष लहान मुलीच्या प्रेमात पडला होता संजय दत्त; अशी आहे दोघांची लव्हस्टोरी
दिव्या अग्रवालने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती नवरीच्या वेषात दिसत आहे. तिने लाल रंगाचा लेहंगा घातला असून तिने अनेक दागिने घातले आहेत. सोबतच तिने नववधूसारखी डोक्यावरून ओढणी घेतलेली आहे. या वेषात दिव्याने काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये तिने नववधूच्या वेशात असताना आपल्या आईला व्हिडीओ कॉल केला आहे. दिव्याला त्या वेशात पाहून तिची आई भावुक झालेली पाहायला मिळाली. दिव्याला नवरीच्या वेशात पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. यावरूनच दिव्याने लग्न केलंय की काय असं चाहते म्हणत आहेत.
पण दिव्याने गुपचूप लग्न केलं नसून एका शूटसाठी दिव्याने हा वेष घेतला होता. ती लवकरच एका वेब शोमध्ये दिसणार आहे, यातीलच पात्राचे फोटो दिव्याने शेअर केले आहेत. दिव्या अग्रवालच्या वाढदिवशीच तिला अपूर्व पाडगावकरने प्रपोज केले आहे. दिव्या अग्रवालच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव अपूर्व पाडगावकर असून तो एक बिझनेसमन आहे तसेच त्याचे मुंबईत अनेक रेस्टॉरंट आहेत. दिव्या अग्रवालची एंगेजमेंट रिंग खूपच खास असून त्यावर खास मराठमोळ्या पद्धतीने 'बायको' असे कोरलेले आहे.
दिव्या अग्रवालबद्दल सांगायचे तर, यापूर्वी ती वरुण सूदला अनेक वर्षांपासून डेट करत होती. दोघेही बराच काळ सोबत होते आणि आता लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या, पण या वर्षी मार्चमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. दिव्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून वरुण आणि तिच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. त्यानंतर आता नऊ महिन्यांतच अभिनेत्रीने अपूर्वसोबत एंगेजमेंटची घोषणा केली आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.