काय म्हणाला भरत ?
भरत एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाला, "आमच्यात शाळेत असल्यापासून मैत्री आहे. शाळेत आमची वेगवेगळ्या स्पर्धेदरम्यान भेट व्हायची. एकदा शाळेत मी ईशाला प्रपोज करणार होतो पण तिचा हात धरला. हे तिला आवडले नाही आणि तिने माझ्या जोरदार कानाखाली मारली. ईशा माझी पहिली क्रश आणि प्रेम आहे. त्यानंतर मी ईशाने एका टिशू पेपरवर आपला नंबर लिहून दिला होता. मग पूढे आमचे बोलणे वाढत गेले."
advertisement
"शाळेच्या काही काळानंतर आमच्यात दुरावा आला. त्यामुळे आमच्यात नंतर कधीच भेट झाली नाही. पुढे 10 वर्षांनंतर एकदा आमची कॅनडाच्या नायगरा फॉल्सला भेट झाली. त्यावेळी पुन्हा आमचे नाते सुरु झाले. मी तिची परवानगी घेऊन पुन्हा एकदा तिचा हात पकडला. त्यावेळी तिला काहीही प्रॉब्लेम आला नाही."
12 वर्षांनंतर नाते तुटले
असे म्हटले जात आहे की, ईशा आणि भरत यांचे एकमेकांशी पटत नव्हते, त्यामुळे त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. नाते नीट टिकून राहावं म्हणून तिने सिनेमात काम करणे सोडून दिले. तरीही नाते तुटले. तिचे लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले होते. त्यांनी 2012 मध्ये लग्न केलं. लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा लग्न केले होते. तेव्हा ईशा म्हणाली, "ही एक आमच्या सिंधी कुटूंबाची परंपरा आहे. मी माझ्या नवऱ्यासोबत पुन्हा लग्न केले. ज्यामुळे आमचे नाते अजून घट्ट होईल. पण आमच्या नशीबाला काहीतरी वेगळेच हवे होते ."
