TRENDING:

रिजेक्ट... रिजेक्ट... रिजेक्ट.... दहावीतच शिक्षण सोडलं, 15 व्या वर्षी मुंबई गाठली; अभिनेता आज करतोय OTT वर राज्य

Last Updated:

Bollywood Actor : बॉलिवूड अभिनेत्याने व्याच्या 15 व्या वर्षी घर सोडलं होतं. 10 वी पूर्ण केल्यानंतर त्याने शिक्षण थांबवलं आणि मुंबई गाठली. आज तो ओटीटीच्या सर्वात यशस्वी स्टारपैकी एक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Bollywood Actor : चित्रपटसृष्टीत असे अनेक स्टार आहेत जे कमी वयातच मायानगरी मुंबईत आले आहेत. वर्षानुवर्षे कष्ट करत, संघर्ष करत तो आज लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे. रोहित सराफ हा असाच एक स्टार आहे. नुकतचं 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रोहित आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई आला होता. वयाच्या 11 वर्षी त्याने आपल्या वडिलांना गमावलं होतं. पुठे वडि
News18
News18
advertisement

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण सोडले

10 वी पूर्ण केल्यानंतर रोहितने वडिलांचे रुपेरी पडद्यावर स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण थांबवले आणि वयाच्या 15 व्या वर्षी एकटाच मायानगरी मुंबईत आला. मात्र नंतर त्याने शिक्षणावरही भर दिला आणि मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी घेतली. रोहितने एकदा वडिलांविषयी सांगितले होते, “माझे वडील खूप मोठे चित्रपटप्रेमी होते. ते जेव्हा घरात असत तेव्हा चित्रपट पाहत असत. मला वाटते तिथूनच ही गोष्ट सुरू झाली. मी मोठा झालो आणि त्यांनी पाहिले की मला चित्रपटांची आवड आहे. त्यांनी मला प्रोत्साहित केले. मला खात्री आहे की जर ते आज मला पाहत असते तर त्यांना नक्कीच अभिमान वाटला असता.”

advertisement

प्रिया बापटनंतर आणखी एका वेब सीरिजमधील Liplock लीक, 'ती' बोल्ड अभिनेत्री कोण?

रोहितने आपल्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनपासून केली आणि हळूहळू टीव्ही शोजमध्ये काम केले. तो एमटीव्हीच्या ‘बिग एफ’ आणि व्ही चॅनेलच्या टीनएज ड्रामाच्या ‘बेस्ट फ्रेंड्स फॉरएवर’मध्ये दिसला. त्यानंतर ‘डिअर जिंदगी’ चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्याने आलिया भट्टच्या भावाची भूमिका साकारली. त्याच्या या कामाचं प्रेक्षकांकडून चांगलच कौतुक झालं होतं. त्यानंतर तो राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’, प्रियंका चोप्रा-फरहान अख्तर स्टारर ‘द स्काय इज पिंक’, ‘लूडो’सारख्या चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत झळकला.

advertisement

आज आहे ओटीटीचा स्टार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

रोहित सराफला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी नेटफ्लिक्सच्या ‘मिसमॅच्ड’ मालिकेत प्राजक्ता कोळीसोबत काम केल्यावर मिळाली. या प्रोजेक्टमधील त्याची आणि प्राजक्ताची जोडी प्रेक्षकांना इतकी आवडली की त्यांच्या रील्स आणि शॉर्ट्स सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले. रोहितला पहिला लीड रोल ‘इश्क विश्क रीबाउंड’ या चित्रपटातून मिळाला आणि आता तो वरुण धवन, जाह्नवी कपूर आणि सान्या मल्होत्रा स्टारर ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’साठी खूप प्रशंसा मिळवत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
रिजेक्ट... रिजेक्ट... रिजेक्ट.... दहावीतच शिक्षण सोडलं, 15 व्या वर्षी मुंबई गाठली; अभिनेता आज करतोय OTT वर राज्य
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल