पूजा दादलानी ही अभिनेता शाहरुखची 12 वर्षांपासून मॅनेजर आहे. ती त्याची फक्त एक मॅनेजरच नाही तर त्यापेक्षा चांगले नाते तिने ठेवले आहे. तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल निर्णयांसाठी ती कायमच प्रमुख आणि योग्य भूमिका बजावत असते. किंग खानच्या चित्रपटाच्या प्रोजेक्ट्स , ब्रँड पासून ते प्रोडक्शन हाऊसची जबाबदारी आणि शाहरुखच्या या मोठ्या यशाच्या मागे ही महत्वाची भूमिका बजावत आहे. ती शाहरुखसोबत अनेक इवेंट्स आणि प्रीमियर्स मध्ये दिसते. ती थोडक्यात पडद्यामागची खरी कलाकार आहे.
advertisement
शाहरुखच्या चित्रपटाने रचला इतिहास, रिलीजआधीच केला हा रेकॉर्ड, बजेट ऐकून व्हाल शॉक
पूजा दादलानीचा पगार किती ?
सियासत, मनीकंट्रोल आणि इतर मीडियाच्या रिपोर्टनूसार पूजा दादलानी ही दरवर्षी 7 ते 9 करोड रुपये कमवते. हा आकडा एखाद्या बॉलिवूडच्या अभिनेत्यापेक्षा कमी नाही.
केव्हा पासून संभाळते आहे शाहरुखचे काम ?
सियासत मीडियाच्या रिपोर्टनूसार , पूजा दादलानी 2012 च्या 'कुछ कुछ होता है' पासून किंग शाहरुखचे काम पाहत आहे. पूजा ही मुंबईमध्येच लहानाची मोठी झाली आहे. आता शाहरुखचे सामान्य व्यवहार ते चित्रपटाच्या आर्थिक बाजूमध्ये तीची महत्वाची भूमिका असते. शाहरुखचे चित्रपट रिलीज आणि इतर प्रोजेक्ट प्लॅनिंग ते कायदेशीर बाबी आणि वेगवेगळे ब्रॅड्स ही सगळी कामे ती जबाबदारीने सांभाळते. तसेच ती रेड चिली एंटरटेनमेंट आणि शाहरुखची आईपीएल टीम कोलकत्ता नाईट राइडर्सचे कामही पाहते.
