अभिनेते शक्ती कपूर यांनी दादा कोंडके यांच्याबरोबर अनेक सिनेमात एकत्र काम केलं. दादा कोंडके यांना त्यांनी फार जवळून पाहिलं आहे. दादांच्या अनेक आठवणींना कलाकार मंडळी उजाळा देत असताना शक्ती कपूर यांनीही दादांची एक खास आठवण शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत शक्ती कपूर यांनी दादांच्या अभिनयाचे तर कौतुक केले आहेच पण दादा एक माणूस म्हणून किती दिलदार होते यावरही त्यांनी मोहर उमटवली आहे.
advertisement
हेही वाचा - 'असा कसा हा नियतीचा खेळ...' दोन दिग्गजांच्या निधनानं हादरली सोनाली; भावुक होत शेअर केली पोस्ट
शक्ती कपूर म्हणाले, "दादांच्या गावी रोज संध्याकाळी खूप माणसं जमायची. गावातील काही तरूण यायचे, म्हातारी माणसे यायची आपल्या समस्या मांडायचे आणि दादा त्यांना मुक्त हस्ते मदत करायचे. दादांनी कधीही त्यांच्या दातृत्वाची दवंडी पिटली नाही".
शक्ती कपूर पुढे म्हणाले, "ॲडव्हान्स इनकम टॅक्स भरणारे दादा कोंडके एकमेव कलाकार असतील. ते नेहमी ज्यादाची रक्कम टॅक्स भरून ठेवायचे जेणेकरून त्यावरून त्यांच्याकडे कुणी बोट दाखवू नये असे त्यांना वाटायचे. सध्या अशी माणसं देवाने बनवणं बंद केलय . एक अत्यंत काटेकोर, शिस्तबध्द आणि तितकेच संवेदनशील माणूस असलेल्या दादांनी मराठी सिनेसृष्टीला जे सिनेमे दिले आहे ते कधीच जुने होणार नाहीत इतका त्यात उत्साह आहे".
