TRENDING:

एका रात्रीत फायनल झाले 2 चित्रपट, एकाने रचला इतिहास, दुसरा ठरला कल्ट क्लासिक

Last Updated:

Bollywood Film : त्या दोन सिनेमांच्या कथा या एका रात्रीत तयार झाल्या होत्या. दोन्ही सिनेमे खूप चालले. एक सुपरहीट झाला तर दूसरा कल्ट क्लासिक ठरला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बॉलिवूडमध्ये काहीही होऊ शकते. कारण 56 वर्षांपूर्वी एका दिग्दर्शकाने एकाच रात्री दोन सिनेमांची स्टोरी फायनल केली होती. या दोन्ही सिनेमांनी हिंदी सिनेमाची उंची टॉपवर नेली होती. या दोन्ही सिनेमांनी इतिहास रचला होता. सिनेमा बनवायचेही त्याच रात्री ठरले होते. या सिनेमामुळे हिंदी सिनसृष्टीला पहिला सुपरस्टार मिळाला होता. या दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शक आणि निर्माते शक्ति सामंत होते.
News18
News18
advertisement

या दोन सिनेमांची नावे आहेत एक 'आराधना' आणि दूसरा 'कटी पतंग'. आराधना सिनेमाची पटकथा ही सचिन भौमिकने लिहली होती. ही कथा अमेरीकेत 1946 मध्ये आलेला सिनेमा 'टू ईच हिज ओन' वरुन प्रेरित होती. सचिनने ही कथा शक्ति सामंतला ऐकवली होती. तेव्हा त्याचे शिर्षक हे 'सुबह प्यार की' असे होते. एस डी बर्मन यांच्या सांगण्यावरुन या सिनेमाचे शिर्षक बदलले गेले.

advertisement

( अभिनेत्याला पाहण्यासाठी फॅन्सनी अख्खं पुणे केलं जाम, सुटकेसाठी मिलीटरीच बोलवली )

कसा झाला कथेचा जन्म ?

त्यावेळी राजेश खन्नाचा 'बहारों के सपने' सिनेमा आला होता. त्याचे काम पाहून शक्ति सामंत यांनी हा सिनेमा राजेश खन्ना यांच्याकडून साइन करुन घेतला. सचिन भौमिकच्या ओळखित शर्मिला टागोर असल्याने तिला कास्ट केले गेले. ज्यावेळी शूटींग सुरु करणार होते त्याच वेळी सुरेंद्र कपूर यांनी त्यांना 'एक श्रीमान एक श्रीमती' नावाचा सिनेमा दाखवला. त्या सिनेमाचा क्लाइमॅक्सही सेम तसाच होता. त्यामुळे त्यांनी हा सिनेमा बनवायचं थांबवलं.

advertisement

त्याकाळातच सामंत यांना गुलशन नंदा भेटले. त्यांनी 'कटी पतंग' सिनेमाची कथा ऐकवली. ती कथा सामंतांना आवडली. सामंत खूप टेन्शनमध्ये होते तेव्हा गुलशन यांनी आराधना सिनेमाविषयी विचारले. कथा ऐकल्यावर त्यांनी डबल रोल करायचा सल्ला दिला. हा सल्ला सामंत यांना खूपच आवडला. या सिनेमाची कथा थोडी बदलली. त्यानंतर 'आराधना' आणि 'कटी पतंग' या दोन सिनेमांचा जन्म झाला. 'आराधना' सिनेमा 7 नोव्हेंबर 1969 मध्ये रिलीज झाला आणि त्याने इतिहास रचला. 'कटी पतंग' सिनेमाही सुपरहिट ठरला.

advertisement

'कटी पतंग' सिनेमामध्ये राजेश खन्ना, आशा पारेख, प्रेम चोपडा, बिंदु, नासिर हुसैन यांसारखे अभिनयाचे बादशहा दिसले होते. याची कथा गुलशन नंदा आणि वृजेंद्र गौरने लिहिली होती. यातील संगीत आरडी बर्मन यांनी दिले होते जे ब्लॉकबस्टर ठरले. 'प्यार दीवाना होता है', 'मस्ताना होता है', 'ये शाम मस्तानी', 'मदहोश किए जा', 'ये जो मुहब्बत है', 'उनका है काम' 'ना कोई उमंग है', 'ना कोई तरंग है' ही प्रसिध्द गाणी आनंद बक्शी यांच्या लेखणीतून उतरली होती.

advertisement

काय म्हणाली अभिनेत्री फरीदा जलाल ?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडण्याचं धाडस केलं अन् सुरू केलं केक शॉप, आज मनाली वर्षाला कमावते 24 लाख!
सर्व पहा

'आराधना' सिनेमात फरीदा जलाल या अभिनेत्रीने राजेश खन्ना यांच्यासोबत काम केले होते. त्या एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या, "आम्हाला फंक्शनला बोलवायचे तेव्हा मी राजेश यांच्यासोबत जायची. मुली त्यांच्यासाठी वेड्या व्हायच्या. कोणी म्हणायच्या गालावर साइन द्या तर कोणी म्हणायच्या माझ्या गळ्यावर साइन करा. इतकी लोकप्रियता कोणाला मिळाली नव्हती."

मराठी बातम्या/मनोरंजन/
एका रात्रीत फायनल झाले 2 चित्रपट, एकाने रचला इतिहास, दुसरा ठरला कल्ट क्लासिक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल