अभिनेत्रीला पुढे एका दिल्ली पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ कॉल येईल असे सांगण्यात आले. त्या कॉलमध्ये एक बनावट पोलीस गणवेशातील व्यक्ती होती. त्याने एका खोट्या सर्वोच्च न्यायालयाच्या नोटीसचा आधार देत अभिनेत्रीला धमकावले की जोपर्यंत ती 6.5 लाख रुपये एका बँक खात्यात जमा करत नाही तोवर तिचे पासपोर्ट जप्त केले जाईल. तसेच पुढील चौकशीनंतर ही रक्कम परत केली जाईल असेही त्या चौकशीनंतर त्या संबंधित व्यक्तिने अभिनेत्रीला आश्वासन दिले.
advertisement
Hema Malini : हेमा मालिनीनं दिलेला 'तो' एक सीन अन् कर्जात बुडाला डायरेक्टर, अभिनेत्रीनं असं काय केलं होतं?
अन् अभिनेत्रीने पैसे ट्रान्सफर केले...
अभिनेत्रीला भीती वाटत असल्याने तिने पैसे ट्रान्सफर केले. दरम्यान, आरोपीने तिला सतत कॅमेऱ्यासमोर आधार कार्ड दाखवायला लावले होते. पैसे पाठवल्यानंतरही आरोपी अभिनेत्रीसोबत संपर्क करत राहिला. त्यामुळे तिला शंका आली आणि तिने हा कॉल स्पॅम अॅपमध्ये तपासला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे अभिनेत्रीच्या लक्षात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीचे ज्या खात्यात पैसे गेले आहेत त्या खात्याची माहिती मागवण्यात आली आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?
डिजिटल अरेस्ट ही फसवणुकीची नवी पद्धत आहे. यात एखादी व्यक्ती स्वत:ला पोलीस अधिकार, CBI, ED अधिकारी, कस्टम्स अधिकारी किंवा वकील असल्याचं भासवून व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करते. डिजिटल अटक करण्यात आल्याचं सांगून ते संबंधित व्यक्तीकडून पैसे उकळतात. हा एक नव्या प्रकारचा फसवणूकीचा प्रकार आहे. त्यामुळे अनोळखी कॉलवर विश्वास न ठेवता, कोणत्याही लिंकवर क्लिक न करता डिजिटल अरेस्टपासून स्वत:चं संरक्षण करता येऊ शकतं.