Diwali Shopping : यापेक्षा स्वस्त कुठेच नाही! 100 रुपयांमध्ये बच्चे कंपनीसाठी कपडे, हा घ्या दुकानाचा पत्ता!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
मार्केटमध्ये सध्या बच्चे कंपनीसाठी आकर्षक ड्रेस अगदी 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक ड्रेसवर 40 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.
पुणे: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. घराघरात साफसफाई, फटाके, फराळ आणि खरेदीची लगबग सुरू झाली आहे. दिवाळी म्हटलं की नवीन कपड्यांशिवाय सण अपुरा वाटतोच, आणि त्यातही सर्वात आधी लक्ष जातं ते बच्चे कंपनीच्या कपड्यांकडे. आकुर्डीतील साने चौकात असलेल्या मार्केटमध्ये सध्या बच्चे कंपनीसाठी आकर्षक ड्रेस अगदी 100 रुपयांपासून उपलब्ध आहेत. याशिवाय अनेक ड्रेसवर 40 ते 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ.
पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी परिसरात सध्या दिवाळीच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. चिखली रोडवरील बाजारपेठांमध्ये कपड्यांवर मोठ्या प्रमाणात सवलती आणि आकर्षक ऑफर्स सुरू आहेत. विशेष म्हणजे, येथे बच्चे कंपनीच्या कपड्यांवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. लहान मुलांसाठीचे आकर्षक ड्रेस अगदी 100 रुपयांपासून उपलब्ध असून, विविध डिझाईन्स आणि व्हरायटीचे कपडे येथे पाहायला मिळत आहेत.
advertisement
दिवाळी जवळ येत असल्याने बाजारपेठांमध्ये खरेदीदारांची मोठी गर्दी दिसत आहे. विशेषत: पालक आपल्या मुलांसाठी रंगीबेरंगी, स्टायलिश आणि आरामदायी कपडे निवडताना दिसत आहेत. काही दुकानदारांनी सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही बच्चे कंपनीच्या कपड्यांना प्रचंड मागणी आहे. ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार कपडे मिळावेत म्हणून आम्ही विशेष ऑफर्स दिल्या आहेत. येथे कपड्यांचे दर फक्त 100 रुपयांपासून सुरू होत असून, अनेक ड्रेसवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping : यापेक्षा स्वस्त कुठेच नाही! 100 रुपयांमध्ये बच्चे कंपनीसाठी कपडे, हा घ्या दुकानाचा पत्ता!