Mixer Grinder Right Use : मिक्सरचे 3 भांडे, मोठं, मध्यम आणि लहान भांडं कोणतं कधी वापरायचं? अनेक गृहिणींना चुकीचा समज
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अनेक महिलांना अजूनही एक प्रश्न पडतो की मिक्सरची तीन भांडी असतात, पण कोणतं भांडं कशासाठी वापरायचं? चुकीचं भांडं वापरल्यास पदार्थ व्यवस्थित वाटत नाहीत, आणि कधी कधी मिक्सरलाही त्रास होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक भांड्याचा योग्य वापर समजून घेणं गरजेचं आहे.
आजच्या आधुनिक स्वयंपाकघरात मिक्सरग्राइंडर ही अत्यावश्यक वस्तू बनली आहे. मसाले वाटणे, चटण्या तयार करणे, ज्यूस बनवणे किंवा सूप बनवणे. हे सगळं काम काही मिनिटांत पूर्ण करणारा हा स्वयंपाकघरातील “सुपरहिरो”च आहे. पण अनेक महिलांना अजूनही एक प्रश्न पडतो की मिक्सरची तीन भांडी असतात, पण कोणतं भांडं कशासाठी वापरायचं? चुकीचं भांडं वापरल्यास पदार्थ व्यवस्थित वाटत नाहीत, आणि कधी कधी मिक्सरलाही त्रास होऊ शकतो. म्हणूनच प्रत्येक भांड्याचा योग्य वापर समजून घेणं गरजेचं आहे.
advertisement
मिक्सरमध्ये सामान्यतः तीन भांडी असतात- मोठं, मध्यम आणि लहान.मोठं भांडं म्हणजे लिक्विडायझर जार. हे प्रामुख्याने द्रव पदार्थांसाठी वापरलं जातं. यात फळांचे ज्यूस, मिल्कशेक, स्मूदी, टोमॅटो प्युरी किंवा सूप तयार करता येतं. यातील ब्लेड पातळ आणि लांब असतात, ज्यामुळे द्रव पदार्थ चांगले मिसळले जातात. अनेक महिला याला जास्त प्रमाणात वाटप काढण्यासाठी वापर करताता पण त्यांचा वाटप फसतो कारण हा ग्रायंडर मिश्रण चांगलं वाटत नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement