डॉक्टर पतीचा थरारक कट, पत्नीला दिले मृत्यूचे इंजेक्शन; डोक सुन्न करणारा 'सायंटिफिक मर्डर'
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Shocking News: बेंगळुरूमध्ये डॉक्टर पतीनेच पत्नीचा थंड डोक्याने खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वैद्यकीय ज्ञान आणि हॉस्पिटल प्रवेशाचा गैरवापर करून डॉक्टर महेंद्र रेड्डी यांनी पत्नी क्रुतिकाला हळूहळू मृत्यूकडे ढकलल्याचा पोलिस तपासात धक्कादायक निष्कर्ष निघाला आहे.
बेंगळुरू: बेंगळुरूतील मध्ये क्रुतिका एम. रेड्डी यांच्या हत्येच्या तपासात एक धक्कादायक उघडकीस आला आहे. तपासादरम्यान असे समोर आले की क्रुतिकाचा पती डॉक्टर महेंद्र रेड्डी याने आपल्या व्यावसायिक ज्ञानाचा आणि वैद्यकीय प्रवेशाचा गैरवापर करून पत्नीला हळूहळू मृत्यूकडे ढकलण्याचा कट रचला होता.
advertisement
ही घटना त्यांच्या लग्नाच्या अवघ्या एका वर्षानंतरच घडली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी क्रुतिका मृत अवस्थेत सापडली आणि सध्या महेंद्र रेड्डीला पोलिसांनी अटक केली आहे.
वैद्यकीय ज्ञानाचा गैरवापर
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार महेंद्र यांनी एप्रिल महिन्यापासून क्रुतिकाला इंट्राव्हेनस (IV) औषधांच्या अनेक डोस दिले होते. हे औषध तिला तिच्या पोटाच्या आणि चयापचयासंबंधी (metabolic) जुन्या तक्रारींवर उपचार म्हणून दिले जात असल्याचे भासवले गेले.
advertisement
महेंद्र हे डॉक्टर असल्यामुळे त्यांनी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटर (OT) आणि आयसीयू (ICU) विभागांमध्ये असलेल्या आपल्या व्यावसायिक प्रवेशाचा गैरवापर करून ही औषधे मिळवली आणि स्वतःच दिली, असे अहवालात म्हटले आहे. तपासात पुढे असेही समोर आले की महेंद्र यांनी क्रुतिकाला अति प्रमाणात ऍनेस्थेटिक (बेहोशीचे) औषध दिले. ज्यामुळे तिच्या श्वसनक्रियेवर परिणाम झाला (respiratory depression) आणि शेवटी तिचा मृत्यू झाला.
advertisement
पुरावे आणि तपासातील निष्कर्ष
या घटनेनंतर ‘अस्वाभाविक मृत्यू अहवाल’ (Unnatural Death Report - UDR) नोंदवण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी कॅन्युला सेट, इंजेक्शन ट्यूब आणि इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. जे या गुन्ह्यात वापरले गेले होते, अशी माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली.
advertisement
याशिवाय पोलिसांनी क्रुतिकाच्या शरीरातील अंतर्गत अवयवांचे (viscera) नमुने तपासासाठी पाठवले. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या अहवालानुसार तिच्या शरीरात प्रोपोफॉल (Propofol) नावाच्या सिडेटिव्ह (झोप आणणाऱ्या औषधाचे) अंश आढळले.
advertisement
वडिलांचा संशय आणि तक्रार
या फॉरेन्सिक अहवालानंतर क्रुतिकाचे वडील मुनी रेड्डी यांना आपल्या जावयावर संशय आला. त्यांनी पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली, ज्यात त्यांनी आरोप केला की महेंद्र यांनी त्यांच्या मुलीला बेहोशीचे औषध देऊन ठार मारले.
advertisement
घटनेचा क्रम
-अहवालानुसार एप्रिलमध्ये पहिला IV डोस दिल्यानंतर क्रुतिकाला अस्वस्थ वाटू लागले. त्यावर महेंद्र यांनी तिला तिच्या आई-वडिलांच्या घरी नेले आणि तिला थोडी विश्रांती हवी असे सांगितले. पण नंतर त्यांनी पुन्हा दुसरा IV डोस दिला.
-23 एप्रिलला पहिल्या डोसच्या दोन दिवसांनी, क्रुतिकाने IV साइटवर वेदना असल्याची तक्रार केली. पण महेंद्र यांनी व्हॉट्सअॅपवर तिला ते काढू नकोस असे सांगितले आणि त्या रात्री त्यांनी तिला पुन्हा इंजेक्शन दिले.
-दुसऱ्या दिवशी सकाळी क्रुतिका अचेत अवस्थेत सापडली. आश्चर्य म्हणजे स्वतः डॉक्टर असूनही महेंद्र यांनी तिच्यावर CPR केले नाही. नंतर रुग्णालयात तिला मृत घोषित करण्यात आले.
महेंद्र रेड्डी यांना आता हत्या प्रकरणात अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही हत्या पूर्वनियोजित आणि अत्यंत कुशलतेने रचलेली होती. जणू एखाद्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून हळूहळू केलेला ‘सायंटिफिक मर्डर’ होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 4:28 PM IST
मराठी बातम्या/देश/
डॉक्टर पतीचा थरारक कट, पत्नीला दिले मृत्यूचे इंजेक्शन; डोक सुन्न करणारा 'सायंटिफिक मर्डर'