'द डर्टी पिक्चर' सुपरहिट झाला होता. पण या सिनेमातील जे कास्टींग झाले होते तेव्हा वेगळीच अभिनेत्री कास्ट झाली होती. या सुपरहीट सिनेमात विद्या बालनचा दिल खेचक अदा आणि रोमान्सने भरलेला अभिनय प्रक्षकांना पाहायला मिळाला होता. पण या चित्रपटासाठी निर्मात्यांची पहिली पसंती अभिनेत्री बॉलिवूड क्वीन कंगना राणौत होती. परंतु काही कारणास्तव या सुपरहिट चित्रपटाला कंगनाने नकार दिला. कंगना या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाली होती, "मला चित्रपटाची स्क्रीप्ट काही खास वाटली नव्हती. मला वाटले नव्हते की, हा चित्रपट सुपरहिट होईल."
advertisement
( लेकीवर टीकेचा भडिमार, काजोलने ट्रोलर्सला चांगलंच झापलं, नेमकं काय घडलं? )
कंगना रणौतने विद्या बालनचे तोंडभरुन कौतुक करताना म्हणाली, "विद्याने सिल्क स्मिताची भूमिका पडद्यावर खूपच चांगली केली. तिने माझ्यापेक्षा चांगला रोल निभावला. मी तिच्यापेक्षा चांगली भूमिका करु शकली नसती. त्यामुळे हा चित्रपट सोडल्याचा कोणताही पश्चाताप नाही."
हा चित्रपट मिलन लुथरिया यांनी दिग्दर्शित केला होता. रजत अरोडा यांनी लिहिला होता. एकता कपूर चित्रपटाची निर्माती होती. यात इमरान हाशमी, नसीरुद्दीन शाह आणि तुषार कपूर यांचाही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटात दाखवले होते की, एका छोट्या गावातून आलेली सिल्क तिने मोठ्या पडद्यावर खूप दशके राज्य केले होते.
या चित्रपटाने 2011 मध्ये बॉक्स-ऑफिसवरती चांगलाच धुमाकूळ घातला होता. अनेक पुरस्कार जिंकले होते. विद्या बालनला या चित्रपटासाठी बेस्ट एक्ट्रेस म्हणून 'फिल्मफेयर' अवॉर्ड मिळाला होता.
