दीपिकाने रणबीर कपूरसोबतच्या तिच्या नात्याबाबत बोलताना एका मुलाखतीत सांगितलं की, “मी जर नात्यात आहे, तर मी मजा करायला बाहेर का जाऊ? त्यापेक्षा एकटं राहाणं चांगलं आहे. पण, प्रत्येकाचा विचार असा नसतो. कदाचित म्हणूनच मला भूतकाळात दुखापत झाली.”
रणबीर कपूरने दीपिका पदुकोणला दोन वेळा धोका दिला
दीपिकाने सांगितलं की, रणबीरने तिच्याकडे पुन्हा संधी देण्यासाठी खूप विनवण्या केल्या, त्यामुळे तिने त्याला दुसरी संधी दिली. पण, तरीही तिने त्याला रंगेहात पकडलं. ती म्हणाली, “पहिल्यांदा जेव्हा त्याने धोका दिला, तेव्हा मला वाटलं की माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. पण, जेव्हा कोणी चीट करण्याला त्याची सवय बनवतं, तेव्हा तुम्हाला कळतं की, समस्या त्याच्यामध्ये आहे.”
advertisement
दीपिका-रणबीरच्या ब्रेकअपबद्दल काय म्हणाल्या होत्या नीतू कपूर?
नीतू कपूर यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं की, "रणबीरच्या फार गर्लफ्रेंड्स नव्हत्या, दीपिका ही त्याची एकमेव गर्लफ्रेंड होती. मला वाटतं की त्यांच्या नात्यात काहीतरी कमी होतं. कदाचित त्यांच्या नात्यात तो नव्हताच, म्हणूनच त्याला नातं तोडायचं होतं." नीतू कपूरने आपल्या मुलाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असला, तरी दीपिकाने मात्र यावर याआधीच स्पष्टीकरण देत रणबीरने तिला वारंवार धोका दिल्याचे सांगितलं होतं.
रणबीर कपूरनेही दीपिकाला धोका दिल्याचं मान्य केलं होतं
दीपिकाने असंही म्हटलं की, “मी नात्यात खूप काही देते, मला जास्त अपेक्षा नसतात. पण, धोका ही अशी गोष्ट आहे, जी नात्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करते. एकदा विश्वास आणि आदर गेला की, नातं संपतं.” काही वर्षांनंतर रणबीर कपूरनेही एका मुलाखतीत दीपिकाला धोका दिल्याचं मान्य केलं होतं. तो म्हणाला होता, “हो, मी धोका दिला होता. पण, तो माझा बालिशपणा होता. अनुभव नसल्यामुळे ते झालं.”
आज हे दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. दीपिकाने अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले आहे, तर रणबीरने आलियासोबत संसार थाटला आहे. दोघेही आता चांगले मित्र आहेत.
