अंकिताने पोस्टमधून दिली मोठी हिंट!
अंकिता लोखंडे ही निर्माता संदीप सिंहची खूप चांगली मैत्रीण आहे. नुकताच संदीपचा वाढदिवस होता. यानिमित्ताने अंकिताने इन्स्टाग्रामवर विकी आणि संदीपसोबतचे काही फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या. या पोस्टमध्ये तिने जे लिहिलं, त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
अंकिताने लिहिलं, “तू खूप चांगला माणूस आहेस. ज्या पद्धतीने तू काल आलास, इतकी काळजी दाखवलीस... माझ्याबद्दल, विकीबद्दल आणि आमच्या होणाऱ्या बाळाबद्दलही इतकं काही बोललास... त्याने मला खूप आनंद आणि भावूक केलं!” हे कॅप्शन पाहताच चाहत्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे!
advertisement
प्रेग्नन्सीच्या बातम्यांना आला जोर!
अंकिताने नकळतपणे केलेल्या या खुलाशानंतर आता तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा अधिकच वाढली आहे. एका युजरने थेट विचारलं, “होणारं बाळ!! थांबा... काय? तू प्रेग्नंट आहेस?” तर दुसऱ्याने, “तुम्ही प्रेग्नंट आहात का? अभिनंदन!” अशा कमेंट्स केल्या आहेत.
यापूर्वी अंकिता ‘लाफ्टर शेफ्स २’ च्या शूटिंगदरम्यान अभिनेता कृष्णा अभिषेकला मस्करीत म्हणाली होती, “मी प्रेग्नंट आहे.” त्यानंतर अंकिता आणि विकीनेही एका व्लॉगमध्ये या अफवांवर चर्चा केली होती. विकी म्हणाला होता की, “संपूर्ण कुटुंब याच विषयावर बोलत आहे आणि लवकरच चांगली बातमी मिळेल.” आता अंकिताच्या या नव्या पोस्टमुळे चाहत्यांना विश्वास वाटू लागला आहे की, ही गोड बातमी खरंच लवकरच अधिकृतपणे जाहीर होईल.