आनंद आहे, पण 'टेन्शन' पण आहे!
शनिवारी रात्री मुंबईतील एका कार्यक्रमाला सनी कौशलने हजेरी लावली. यावेळी पत्रकाराने त्याला वहिनी कॅटरीना कैफच्या गरोदरपणाबद्दल विचारले. यावर प्रतिक्रिया देताना सनीच्या चेहऱ्यावर काका बनण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. सनी कौशलने सांगितले की, घरात सगळेच खूप आनंदी आहेत, पण त्याचसोबत थोडी धाकधूक पण आहे. तो म्हणाला, "सगळ्यांना खूप आनंद झाला आहे आणि त्याच वेळी, 'पुढे काय होईल?' याची थोडी भीतीही वाटत आहे."
advertisement
'त्या' दिवसाची उत्सुकता
सनी कौशलने पुढे सांगितले की, "आम्ही सर्वजण त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत, जेव्हा बाळ आमच्यासोबत असेल." सनीच्या या विधानावरून कौशल कुटुंबात येणाऱ्या नव्या पाहुण्याबद्दल प्रचंड उत्सुकता आणि तयारी सुरू असल्याचे दिसून येते. कौशल कुटुंबीयांमध्ये कॅटरीनाचे गरोदरपण हा सध्या चर्चेचा आणि आनंदाचा विषय आहे, पण पहिल्यांदाच कुटुंबात बाळाचे आगमन होणार असल्याने सगळ्यांना एक वेगळेच टेन्शन आले आहे.
विकी आणि कॅटरीना यांनी गेल्या महिन्यात एका खास फोटोसह ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यांनी एक ब्लॅक अँड व्हाईट पोलारॉइड फोटो पोस्ट केला होता, ज्यात कॅटरीना आपला बेबी बंप दाखवताना दिसत होती. तर विकीनेही तिच्या पोटावर प्रेमाने हात ठेवला होता. या फोटोसोबत लिहिले होते, "आम्ही आनंद आणि कृतज्ञतेने भरलेल्या हृदयाने आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्यायाची सुरुवात करत आहोत." विकी-कॅटरीनाचे चाहते आता त्यांच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.