किंग शाहरुख खानने आपल्या अभिनयाची सुरुवात 1989 मध्ये आलेल्या 'फौजी' या मालिकेमधून केली होती. कोणालाच वाटले नव्हते की एका सामान्य घरातून आलेला मुलगा एवढा मोठा जगाचा हिरो होईल. त्याने मालिका विश्वात काम केल्यानंतर तीन वर्षांनंतर 1992 मध्ये आपल्या पहिल्या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्याचा पहिला सिनेमा होता 'दीवाना'. या सिनेमाने त्याला सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून चांगली ओळख दिली. या सिनेमाचे दिग्दर्शन राज कवर यांनी केले होते. या सिनेमात शाहरुख सोबत ऋषि कपूर, दिव्या भारती आणि अमरीश पुरी अशी तगडी कास्टींग होती.
advertisement
इंडस्ट्रीतला सगळ्यात महागडा अभिनेता, आईची एक्झिट अन् फिल्मी दुनियेत पाऊल, नेटवर्थ ऐकूण बसेल शॉक
या सिनेमाने किती गल्ला जमवला ?
'दीवाना' सिनेमा हा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. पण या सिनेमाला एकूण खर्च किती आला होता आणि या सिनेमाने किती कमाई केली. या सिनेमाची ही खास वैशिष्टे आहेत. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'दीवाना' सिनेमाचे बजेट 4 कोटी एवढे होते. या सिनेमाने मात्र जगभरात 13 कोटी रुपयाचा गल्ला जमवला. सिनेमासोबतच शाहरुखही सुपरहिट झाला होता. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्याने कित्येक सिनेमे हिट दिले ज्यात तो कधी 'बादशाह' झाला, तर कधी 'पठाण', कधी 'जवान', तर कधी 'रईस'. शाहरुख हा जगातील श्रीमंत अभिनेत्यांमध्ये गणला जातो. त्याचे नेटवर्थ अंदाजे 12,500 हजार कोटी पेक्षा जास्त आहे.
शाहरुखचा येणारा नवा सिनेमा
शाहरुख सध्या नवा सिनेमा 'किंग' वरती काम करत आहे. या सिनेमात त्याची मुलगी सुहाना खान दिसणार आहे. या सिनेमाची सोशल मीडीयावर खूप चर्चा होती. पण आता शाहरुखने 'किंग' सिनेमाचा टीजर वायरल केला आहे. तो चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा सिनेमा नव्या वर्षात म्हणजेच 2026 ला रिलीज होणार आहे.
