TRENDING:

'तारक मेहता का उल्टा चष्मा' बॉयकॉट करण्याची मागणी, या कारणामुळे संतापले चाहते

Last Updated:

आता या शोवर लोक बहिष्कार टाकत आहेत. ज्यामुळे बॉयकॉट तारक मेहेता असं सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 03 डिसेंबर : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो वर्षानुवर्षे लोकांच्या पसंतीस उतरला आहे. लहानांपासून ते अगदी थोरा मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हा शो फारच आवडतो. तुमचा मुड अगदी कसाही असो, या शोमधले पात्र तुमचं मन नक्कीच बदलतात. परंतू आता हा शो बऱ्याच दिवसांपासून वादात सापडला आहे.,
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

अनेक मोठ्या आणि जुन्या कलाकांनी शो सोडल्यामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. तसेच यामुळे मेकर्सना देखील धक्का बसला आणि ते ही परिस्थीती कशीबशी हाताळण्याचा प्रयत्न करत आहे. पण यातच आता या शोवर लोक बहिष्कार टाकत आहेत. ज्यामुळे बॉयकॉट तारक मेहेता असं सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं आहे.

खरंतर अनेक महिन्यांपासून दयाबेन शोमधून गायब आहे. खरंतर हे व्यक्तीमत्व साकारणाऱ्या दिशा वकानीने हा शो सोडला आहे. तिच्या पुनरागमनाबाबत अनेक बातम्या समोर आल्या पण. निर्माते प्रत्येक वेळी चाहत्यांना सांत्वन देत राहिले की दयाबेन लवकरात लवकर शोमध्ये परत येईल, परंतु तसे झाले नाही.

advertisement

advertisement

प्रेक्षकांची उत्सुकता लक्षात घेऊन 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते गेल्या अनेक भागांपासून दयाबेन येण्या संबंधित कहाणी दाखवत आहेत. दयाबेनच्या स्वागतासाठी केवळ गाडा परिवारच नाही तर संपूर्ण गोकुळधाम जय्यत तयारी करताना दिसले. मात्र आता आगामी एपिसोडच्या प्रोमोमध्ये काही कारणास्तव दयाबेन येऊ शकल्या नसल्याचे दाखवण्यात आले आहे.

advertisement

सुंदर स्वत: दियाबेनच्या अनुपस्थितीची बातमी सांगतो, ज्यामुळे जेठालाल आणि टप्पू तसेच गोकुलधाम सोसायटीतील सर्व लोकांना राग येतो. प्रेक्षक आणि चाहत्यांनाही निर्मात्यांच्या या युक्त्या आवडल्या नाहीत. दयाबेनने पुनरागमन न झाल्यामुळे चाहतेही संतप्त झाले आहेत. ज्यामुळे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा बहिष्काराचा ट्रेंड X ला सुरू झाला.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'तारक मेहता का उल्टा चष्मा' बॉयकॉट करण्याची मागणी, या कारणामुळे संतापले चाहते
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल