रक्षाबंधनाच्या दिवशी कुशल बद्रिकेने शेअर केलेली पोस्ट पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कुशलने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर समुद्रकिनारी बसलेला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्याने एक विचारमंथन करणारे कॅप्शन लिहिले आहे. त्यात तो म्हणतो, “श्रीकृष्णाच्या करंगळीचा घाव भरायला द्रौपदी धावली. पण अश्वत्थाम्याची जखम मात्र कायम भळभळती राहिली, चिरकाल.” पुढे तो लिहितो, “नियती फार क्रूर असते, जखमा भरून यायला सुद्धा जन्म ‘कृष्णाचा’ यावा लागतो. :- सुकून.”
advertisement
41 वर्षीय अभिनेत्री बनली ओटीटी सेन्सेशन, लीड रोल न करता ट्रेंडिंग, ओळखलंत का?
या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी विचारले की ही पोस्ट कोणत्या खास प्रसंगाशी संबंधित आहे का? काहींनी अंदाज वर्तवला की कुशलने कदाचित आयुष्यातील एखाद्या अनुभवावरून हा विचार मांडला असावा.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या शूटिंगच्या आठवणी, कुटुंबातील क्षण आणि वैयक्तिक विचार फॅन्ससोबत शेअर करतो. पण अशी तत्त्वज्ञानाने भरलेली पोस्ट तो क्वचितच करतो. त्यामुळे चाहत्यांनीही त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या पोस्टखाली एका चाहत्याने लिहिले, “खरंच, काही जखमा कधीही भरत नाहीत.” तर दुसऱ्याने म्हटले, “तुझं लिखाण नेहमीच मनाला भिडतं.”
दरम्यान, कुशल सध्या ‘चला हवा येऊ द्या’सोबतच काही चित्रपट प्रकल्पातही व्यस्त आहे. मात्र तरीही तो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतो.
