OTT Actress: 41 वर्षीय अभिनेत्री बनली ओटीटी सेन्सेशन, लीड रोल न करता ट्रेंडिंग, ओळखलंत का?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
OTT Actress: बॉलिवूडमध्ये ती मुख्य अभिनेत्री म्हणून फारशी दिसली नाही, पण ओटीटी जगतात तिचं नाव एक वेगळा दर्जा मिळवून बसलं आहे. 41 वर्षांची ही अभिनेत्री ओटीटीची क्वीन आहे.
advertisement
advertisement
आपण बोलत असलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सुरवीन चावला आहे. सुरवीन आता प्रेक्षकांसाठी आणखी एक धमाका घेऊन येत आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणारी सुपरनॅचरल हॉरर सीरिज ‘अंधेरा’ 14 ऑगस्टला जागतिक प्रीमियर करणार आहे. राघव दार दिग्दर्शित या मालिकेत सुरवीनसोबत प्रिया बापट, करणवीर मल्होत्रा आणि प्राजक्ता कोळी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
2003 मध्ये तिने 'कहीं तो होगा' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. यानंतर, ती 'कसौटी जिंदगी की' आणि 'काजल' यांसारख्या मालिकांमध्येही दिसली. 2013 मध्ये तिने 'अग्ली' या चित्रपटात काम केले. पण तिला खरी ओळख मिळाली ती 2014 साली आलेल्या 'हेट स्टोरी 2' या चित्रपटातून. या चित्रपटातील तिच्या बोल्ड आणि दमदार भूमिकेमुळे ती चर्चेत आली.
advertisement


