TRENDING:

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘छावा’, विकी कौशलनं जिंकली मनं, पाहा काय केलं?

Last Updated:

Chhaava: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा ‘छावा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजीनगरमध्ये आला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
advertisement

छत्रपती संभाजीनगर: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हिंदी चित्रपट ‘छावा’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शंभूराजेंची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने शिव-शंभू प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. यातच ‘छावा’मध्ये छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाला. शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष केला. यावेळी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

advertisement

अभिनेता विकी कौशल हा ‘छावा’च्या प्रमोशनसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आला आहे. यावेळी विकी कौशलने 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या घृष्णेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक केला आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. त्यानंतर शहरातील प्रसिद्ध क्रांती चौकात येऊन त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष केला.

advertisement

माफीनाम्याची नौटंकी नको, राहुल सोलापूरकर पुरावेच द्या! इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांचा संताप

दरम्यान, विकी कौशलला पाहिण्यासाठी क्रांती चौकात तरुण-तरुणींनी मोठी गर्दी केली होती. ज्या शहरात औरंगजेबाला कबर खोदावी लागली त्या शहरात विकी कौशल आल्याने शिव-शंभू प्रेमींनी एकच जल्लोष केला. विकी कौशलने उघड्या जीपमधून फिरत आपल्या चाहत्यांना अभिवादन केलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा ‘छावा’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारलीये. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई यांच्या रुपात दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून शिव-शंभू प्रेमी आणि चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. 14 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

advertisement

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/मनोरंजन/
छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘छावा’, विकी कौशलनं जिंकली मनं, पाहा काय केलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल