पुण्यातल्या सिंहगडाच्या पायथ्याशी, डोणजे गावातलं नाना पाटेकरांचं हे सुंदर फार्महाऊस आहे. मोठ्या आलिशान बंगल्यांपेक्षा पूर्ण वेगळं, साधं, नैसर्गिक वातावरणातलं. इथे नाना पाटेकर अत्यंत साधं जीवन जगतात. अंगणात झाडं, फुलं, गोठ्यात गाई, आणि स्वयंपाकासाठी चुलीवर शिजलेलं जेवण हे सगळं या घराला खास बनवतं. पुस्तकांसाठी एक वेगळा कप्पा आहे, जिथे नाना तासनतास वाचन करतात.
advertisement
बॉलिवूड ते बिझनेस क्वीन! शिल्पा शेट्टीची एकूण संपत्ती किती? कुठून कमावते इतका पैसा
यावर्षी गणेशोत्सवासाठी “नानाची वाडी”त विशेष फुलांची सजावट करण्यात आली होती. बाप्पाचं सुंदर मखर, पारंपरिक सजावट आणि ग्रामिण वातावरण पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना सुखावणारं होतं. नाना स्वतः बाप्पाची आरती करतात, प्रसाद वाटतात आणि आलेल्या पाहुण्यांना आपुलकीनं जेवायला बसवतात.
या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नानाच्या फार्महाऊसवर जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. दर्शनानंतर नाना, फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र स्नेहभोजनही केलं.
नाना पाटेकरांचं हे फार्महाऊस केवळ गणेशोत्सवासाठीच चर्चेत राहत नाही, तर अनेक कलाकार आणि मित्रमंडळी इथे वेळोवेळी येऊन गेले आहेत. नाना स्वतः शेतात काम करतात, गाई-गुरांची काळजी घेतात आणि साधेपणातही खऱ्या आयुष्याचा आनंद घेतात.