TRENDING:

'... आणि संपूर्ण पाठीवर नखांचे ओरखडे होते' अभिनेत्रीला कारपर्यंत पोहोचणं ही अशक्य, चित्रांगदाने सांगितला फॅन्सचा तो भयंकर अनुभव

Last Updated:

नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे सिनेसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चित्रांगदानेही आपला अनुभव शेअर केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या आवडत्या कलाकाराला डोळ्यासमोर पाहणं, त्याच्यासोबत एक सेल्फी घेणं किंवा फक्त हात उंचावून दाद देणं, हे कोणत्याही चाहत्यासाठी स्वप्नासारखं असतं. पण जेव्हा हेच प्रेम वेडेपणात बदलतं आणि चाहत्यांची गर्दी अनियंत्रित होते, तेव्हा सेलिब्रिटींसाठी ही परिस्थिती दुस्वप्न ठरते. चंदेरी दुनियेत चमकणाऱ्या ताऱ्यांच्या मागे केवळ ग्लॅमर नसतं, तर कधी कधी जीवावर बेतणारे प्रसंगही असतात.
अभिनेत्री चित्रांगदा सिंग
अभिनेत्री चित्रांगदा सिंग
advertisement

नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे सिनेसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निधी अग्रवाल असो वा सामंथा रुथ प्रभू, या अभिनेत्रींना ज्या प्रसंगांना सामोरे जावे लागले, ते पाहून चाहतेही अवाक झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी निधी अग्रवाल हैदराबादमधील 'लुलु मॉल'मध्ये तिच्या आगामी 'द राजा साब' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. तिथे झालेली प्रचंड गर्दी पाहून निधी घाबरली, तिला कारमध्ये बसणंही कठिण झालं होतं. व्हायरल व्हिडिओमध्ये ती अत्यंत घाबरलेली आणि स्वतःचा ओढणी सावरत गर्दीतून मार्ग काढताना दिसली. त्यावेळी अनेक लोक तिला हात लावण्याचा ढकलण्याचा प्रयत्न करत होते. असंच काहीसं सामंथा रुथ प्रभू सोबतही घडलं होतं. एका कार्यक्रमात सुरक्षा कडे तोडून गर्दी सामंथाच्या इतकी जवळ पोहोचली की तिला तिथून पळ काढावा लागला.

advertisement

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहने ही गर्दीच्या अशाच एका हिंसक अनुभवाबद्दल मौन सोडलं आहे. तिने तिच्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाबद्दल सांगितलं आहे. केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेतेही या अशा पद्धतीच्या गर्दीचे बळी ठरतात. 'आय, मी और मैं' चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिल्लीतील एका कॉलेजमध्ये अशीच गर्दी झाली होती.

चित्रांगदा सांगते की, "त्यावेळी गर्दी इतकी हिंसक झाली होती की जॉन अब्राहमने मला वाचवण्यासाठी स्वतःला एका 'ढाल'प्रमाणे वापरलं. जेव्हा आम्ही कसाबसा मार्ग काढून कारमध्ये पोहोचलो, तेव्हा जॉनची पाठ नखांच्या ओरखड्यांनी भरलेली होती." चाहत्यांचे हे टोकाचे वेडेपण कलाकारांना शारीरिक इजा पोहोचवू शकते, याचे हे भीषण पुरावे आहेत. हे असे प्रसंग हे पुन्हा पुन्हा दाखवून देतात की स्टार्सना का एवढ्या मोठ्या टीमची आणि बॉडिगार्डची गरज असते.

advertisement

चित्रांगदाने यावेळी इव्हेंट मॅनेजमेंट आणि सुरक्षा यंत्रणांच्या नियोजनावर थेट ताशेरे ओढले आहेत. "कलाकारांना अशा परिस्थितीत पोहोचूच का दिले जाते जिथे त्यांची सुरक्षा धोक्यात येईल?" असा सवाल तिने उपस्थित केला आहे. दहीहंडीसारख्या मोठ्या सणांच्या वेळी अनेकदा लोक सेलिब्रिटींच्या गाड्यांवर हल्ला करतात किंवा त्यांना घेराव घालतात. हा अनुभव अत्यंत भीतीदायक असतो, असंही तिने नमूद केलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फक्त 10 लाख रुपयांचा पेन, पुणेकरांसाठी मोफत प्रदर्शन, कधी आणि कुठं पाहता येणार?
सर्व पहा

चाहत्यांचे प्रेम हे कलाकारांचे बळ असते, पण हे प्रेम हिंसक वळण घेत असेल तर ते चिंताजनक आहे. गर्दीच्या व्यवस्थापनात होणारी हलगर्जी कलाकारांच्या जिवावर बेतू शकते, हे निधी, सामंथा आणि जॉनच्या अनुभवावरून स्पष्ट होत आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'... आणि संपूर्ण पाठीवर नखांचे ओरखडे होते' अभिनेत्रीला कारपर्यंत पोहोचणं ही अशक्य, चित्रांगदाने सांगितला फॅन्सचा तो भयंकर अनुभव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल