TRENDING:

Bigg Boss नंतर पिक्चरचा हिरो झाला छोटा पुढारी! थिएटरमध्ये करणार राडा, फर्स्ट लुक आऊट

Last Updated:

Chota Pudhari Movie : बिग बॉसनंतर छोटा पुढारी आता सिनेमाचा हिरो झाला आहे. त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छोटा पुढारी बनून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवलेला घनश्याम दरोडे. घनश्याम बिग बॉस मराठी 5 मध्ये सहभागी झाला होता. बिग बॉसमध्ये त्याचं एक वेगळं रुप पाहायला मिळालं होतं. बिग बॉसनंतर घनश्याम दरोडे काही रिअलिटी शोमध्येही दिसला होता. हाच छोटा पुढारी आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बिग बॉसनंतर छोटा पुढारी आता सिनेमाचा हिरो झाला आहे. त्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
News18
News18
advertisement

चित्रपटात हिरो बनण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांची गोष्ट छोटा पुढारीच्या सिनेमात पाहायला मिळणार आहे. 'पिक्चर बॉईज' असं त्याच्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमातून प्रेक्षकांना कॉमेडीचा डोस मिळणार आहे. सिनेमाचं दमदार पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आला आहे. ज्यात घनश्यामचा वेगळात अंदाच पाहायला मिळतोय.

( टेलिव्हिजनची सोज्वळ सून, सोशल मीडियावर भलतीच बोल्ड; नुसतं जॅकेट घातलं अन्... PHOTO )

advertisement

सिनेमाच्या पोस्टरमध्ये छोटा पुढारीला तीन मित्रांनी उचलून घेतलं आहे. तिघेही कलरफूल कपड्यात आहेत. छोटा पुढारीचा वेगळाच स्वॅग सिनेमात पाहायला मिळणार आहे. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, घनश्याम दरवडे (छोटा पुढारी) आणि इतरही नवे जुने कलाकार सिनेमात दिसणार आहेत. हिरो बनण्याची धडपड असलेल्या तरुणांची गोष्ट विनोदी, मनोरंजक पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न या सिनेमातून करण्यात आला आहे.

advertisement

त्रिमूर्ती फिल्म्सनं 'पिक्चर बॉईज' या सिनेमाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंग राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोटा झाला तरी निर्णय घेतला, टरबूज लागवड ठरली फायद्याची, 8 लाखांचा नफा
सर्व पहा

सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.  उन्हाळ्याच्या सुट्टीत पुरेपूर मनोरंजन करणारा "पिक्चर बॉईज" हा सिनेमा 15 मे रोजी रिलीज होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss नंतर पिक्चरचा हिरो झाला छोटा पुढारी! थिएटरमध्ये करणार राडा, फर्स्ट लुक आऊट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल