TRENDING:

Bigg Boss सोबतचा वाद पेटला! दिव्या शिंदेने उपसली कायदेशीर तलवार; निर्मात्यांविरुद्ध उचललं मोठं पाऊस

Last Updated:

Divya Shinde Bigg Boss Marathi 6 Controversy: "घराबाहेर पडल्यावर तलवार चालवेन" या एका विधानामुळे दिव्याला शोमधून तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, दिव्याने आता खरी 'तलवार' उपसली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी प्रेक्षकांमध्ये सध्या 'बिग बॉस मराठी ६' ची जेवढी चर्चा आहे, त्याहूनही जास्त चर्चा आहे ती घरातून बाहेर काढण्यात आलेल्या दिव्या शिंदे हिची. "घराबाहेर पडल्यावर तलवार चालवेन" या एका विधानामुळे दिव्याला शोमधून तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मात्र, दिव्याने आता खरी 'तलवार' उपसली आहे. आज संध्याकाळी ७:३० च्या सुमारास दिव्या शिंदेने आपल्या वकिलांसह पोलीस ठाणे गाठले असून, निर्मात्यांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
News18
News18
advertisement

वकिलांसह दिव्या शिंदेची पोलिस स्टेशनमध्ये धडक

दिव्या शिंदे आज संध्याकाळी ७:३० वाजता वकील ॲड. नितीन सातपुते यांच्यासह मुंबईतील आरे पोलीस ठाण्यात पोहोचली. बिग बॉसचे निर्माते आणि दिग्दर्शक प्रथमेश देसाई व इतर यांच्याविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यासाठी तिने धाव घेतली आहे. दिव्याचा आरोप आहे की, तिला शोमध्ये आणि सोशल मीडियावर 'कोंबडी' सारख्या अपमानास्पद शब्दांनी हिणवण्यात आलं. केवळ इतकंच नाही, तर तिला तिचं घटनात्मक मत मांडण्यापासून रोखलं गेलं आणि तिचा मानसिक छळ करण्यात आला. यामुळे तिने आता अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा (SC/ST Act) अंतर्गत तक्रार देण्याचा पवित्रा घेतला आहे.

advertisement

Neena Gupta: 'सांगायला खूप त्रास होतोय, पण...' प्रेम नाही, तर 'या' कारणामुळे नीना गुप्ता यांनी 50 व्या वर्षी केलं लग्न

दिव्याचा खळबळजनक खुलासा

पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वी दिव्याने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक खुलासे केले. दिव्या म्हणाली, "मी स्वतः कन्फेशन रूममध्ये जाऊन रडले होते, मला शो सोडायचा होता कारण तिथे माझ्या स्वाभिमानाची पायमल्ली होत होती. पण निर्मात्यांनी हे कधीच टीव्हीवर दाखवलं नाही. प्रेक्षकांना फक्त माझं भांडण दाखवलं, पण त्यामागचं सत्य दडवून ठेवलं." तिने पुढे असंही सांगितलं की, घरातील राकेश बापट, ओमकार राऊत आणि करण सोनावणे यांनी तिची मानसिक स्थिती ओळखून तिला पाठिंबा दिला होता. राकेशने तर बिग बॉसला विनंती केली होती की दिव्याला समजून घ्या, पण हे फुटेज जाणीवपूर्वक एडिट करण्यात आलं, असा गंभीर आरोप तिने क्रिएटिव्ह टीमवर केला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, हळदीच्या दरात मोठी वाढ, डाळिंबाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

दिव्याने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एका बाजूला निर्माते आपल्या नियमावलीचा हवाला देत आहेत, तर दुसरीकडे दिव्याने आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss सोबतचा वाद पेटला! दिव्या शिंदेने उपसली कायदेशीर तलवार; निर्मात्यांविरुद्ध उचललं मोठं पाऊस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल