दीपिका रणवीर आपल्या चिमुकल्या लेकीला घराकडे घेऊन रवाना झाले आहेत. याचे फोटोही समोर आले आहेत. अशातच दीपिकाने आपल्या बायोमध्ये बदल केला असून तिने तिचं नवीन रुटीन सांगितलं आहे. दीपिकाने तिच्या बायोमध्ये लिहिलंय, 'फीड, बर्प, स्लीप, रिपीट.' दीपिकाचा बदलेला बायो सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
दीपिका पादुकोणच्या या बायोमध्ये असे दिसून आले आहे की प्रसूतीनंतर ती संपूर्ण दिवस बाळाला खायला आणि झोपण्यात घालवत आहे. दीपिकाचा बायो रेडिटवर व्हायरल होत आहे, जिथे तिची प्रशंसा केली जात आहे. लोक तिला गोंडस आई म्हणत आहेत.
advertisement
दरम्यान, दीपिकाची डिलिव्हरी डेट 28 सप्टेंबर सांगण्यात आली होती. मात्र आधीच ती आई बनली. दीपिका आणि रणवीर सिंग लग्नाच्या 6 वर्षांनंतर आई-बाबा बनले आहेत. 2018 मध्ये दोघांनी इटलीमध्ये लग्न केलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 15, 2024 3:13 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Deepika Padukone Baby : दीपिका पादुकोण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, आई बनल्यानंतर असं आहे रूटीन!
