Deepika Padukone : दीपिका पदुकोण आजच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वाधिक मागणी असलेल्या आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. गेल्या 18 वर्षांपासून ती इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. अभिनयात येण्यापूर्वी दीपिका एक यशस्वी मॉडेल होती. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. पण तुम्हाला माहिती आहे का की, बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री प्रत्यक्ष आयुष्यात किती शिकलेली आहे? दीपिका पदुकोणच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल जाणून घ्या...
advertisement
5 जानेवारी 1986 रोजी जन्मलेली दीपिका पदुकोण एका स्पोर्ट्स फॅमिलीशी निगडित आहे. तिच्या वडिलांचं नाव प्रकाश पदुकोण आहे, जे एक व्यावसायिक बॅडमिंटनपटू होते, तर तिची बहीण अनीषा पदुकोण ही एक गोल्फर आहे. वडील आणि बहिणीच्या पावलांवर न चालता, दीपिकानं ग्लॅमर वर्ल्डमध्ये पाऊल ठेवलं. तिनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. फक्त आठ वर्षांची असतानाच तिनं काम करायला सुरुवात केली आणि अनेक जाहिरातींमध्ये काम केलं.
Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी, फिल्ममध्ये वकील, पण रिअल लाइफमध्ये सातवी फेल आहे अक्षय कुमार, स्वत:च केला खुलासा
दीपिका पदुकोणचं शिक्षण किती?
कामासोबत अभ्यास करणं दीपिका पदुकोणसाठी खूप कठीण होतं. 2017 मध्ये हेमा मालिनी यांच्या "बियॉन्ड द ड्रीम गर्ल" च्या लॉन्च इव्हेंटमध्ये, दीपिकानं आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल उघडपणे भाष्य केलं होतं. तिने सांगितलं होतं की, ती फक्त 12वी पास आहे. तिने अनेक वेळा पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण कामाच्या व्यापामुळे ते शक्य झालं नाही. तिच्या म्हणण्यानुसार, चित्रपटसृष्टीतल्या कारकिर्दीसाठी तिनं आपलं शिक्षण अर्धवट सोडलं आहे.
दीपिका पदुकोणच्या वडिलांना असं वाटायचं की तिनं आपलं करिअर घडवतानाच अभ्यासाकडेही लक्ष द्यावं, आणि दीपिकानं तसं करण्याचा प्रयत्नही केला. 12वी उत्तीर्ण केल्यानंतर तिनं पदवीसाठी प्रवेश घेतला होता, पण कामाच्या व्यापामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आलं नाही. त्यानंतर तिनं डिस्टन्स एज्युकेशन मार्फत डिग्री घेण्याचा प्रयत्न केला, पण तेही शक्य झालं नाही. शेवटी तिच्या कुटुंबालाही तिच्या अभिनयाच्या वेडाची जाणीव झाली आणि त्यांनीही ते स्वीकारलं. दीपिकाने आज शिक्षण पूर्ण केलं नसलं, तरी तिच्या मेहनतीच्या जोरावर आज ती 500 कोटी रुपयांची संपत्ती असलेली यशस्वी अभिनेत्री आहे.