बिग बॉस मराठी 5 चे दमदार स्पर्धक धनंजय पोवार म्हणजेच डीपी दादांही प्रणितच्या सपोर्टमध्ये उतरले आहेत. डीपी दादांनी व्हिडीओ शेअर करत प्रणितला सपोर्ट दिला आहे. तू लढ म्हणत त्यांनी प्रणितला सपोर्ट केलं आहे. मराठी माणसाला होणारा पाहून आमची मनं दुखावली जात आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.
advertisement
डीपी दादांनी घरातील प्रणित मोरे आणि अरमान मलिकच्या भांडणाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सगळे प्रणितबरोबर भांडत आहेत. मागून येऊन त्याच्या अंगाशी विचित्र चाळे करताना दिसत आहे. या व्हिडीओवर डीपी दादांनी संताप व्यक्त केला आहे.
डीपी दादांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय, "हा व्हिडीओ बघितला ना. हे असं मराठी माणसाबरोबर केलं जातं. सतत तुच्छ लेखलं जातं, सतत कमी लेखलं जातं. जे काय करायचं, जो काय इतिहास घडवायचा तो अख्ख्या महाराष्ट्राने घडवायचा. महाराष्ट्राच्या मनगटात इतका दम आहे म्हणून त्यांनी घडवला आहे. हे हिंदी लोक आम्हाला ट्रोल करताय, आमची चेष्टा मस्करी करताय, नाय नाय त्या हरकती करताय ना, या सगळ्या गोष्टींमुळे आमची मनं दुखावतायत हे लक्षात ठेवा."
डीपी दादांनी पुढे म्हटलंय, "या एका प्रणित मोरेला, एका मराठी माणसाला हे तुम्ही त्याला घरात बसून ट्रोल करताय, त्याच्याबरोबर जे किडे करताय हे अख्खा महाराष्ट्र बघतोय. आज सर्वात जास्त सोशल मिडिया वापरला जाणारा वर्ग महाराष्ट्रात आहे. आज हा मराठी माणूस, भाई जोक नाही, प्रणित तू फक्त लढ. अख्खी अकरा करोड लोक आम्ही तुझ्यासोबत आहोत, एक मराठी म्हणून. तुझा खेळ सुंदर आहे, तू सुंदर खेळतोयस, खेळत राहा."