पॉडकास्टमध्ये दिली साखरपुड्याची माहिती
अर्जुनच्या साखरपुड्याची बातमी रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये आऊट झाली आहे. एपिसोडपूर्वी रिलीज झालेल्या एका टीझरमध्ये गॅब्रिएलाने त्यांच्या नात्याबाबत संकेत दिले. त्यानंतर रामपालने स्पष्ट केलं की त्याचा खरोखरच साखरपुडा झाला आहे.
अर्जुन आणि गॅब्रिएला गेल्या सुमारे सहा वर्षांपासून एकत्र आहेत आणि त्यांना दोन मुलगे आहेत. त्यांचा मोठा मुलगा एरिकचा एप्रिल 2019 मध्ये जन्म झाला आहे. तर लहान मुलगा आरिव 2023 मध्ये जन्माला आला. या जोडप्याने आपलं कौटुंबिक आयुष्य बऱ्याच अंशी खासगीच ठेवलं आहे.
advertisement
पॉडकास्टदरम्यान अर्जुन रामपालने त्याच्या नात्याच्या सुरुवातीच्या काळातील एक मजेशीर किस्साही सांगितला. त्याने गंमतीने कबूल केलं की सुरुवातीला ते गॅब्रिएलाच्या सौंदर्यामुळे तिच्याकडे आकर्षित झाला होता.
कोण आहे गॅब्रिएला डेमेट्रियाडेस?
गॅब्रिएला डेमेट्रियाडेसचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला असून तिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली. नंतर तिने फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतले आणि हळूहळू मॉडेलिंगच्या क्षेत्रात पुढे जात स्वतःचा करिअर मार्ग घडवला. कॉस्मोपॉलिटनच्या रिपोर्टनुसार, गॅब्रिएलाने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतातील सनसाइड येथील एका विद्यापीठातून फॅशन डिझाइनचे शिक्षण घेतले.
मॉडेलिंगसोबतच चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये छोट्या भूमिका करत त्यांनी स्वतःचा कपड्यांचा ब्रँड ‘डेमे’ लॉन्च केला आणि ‘व्हीआरटीटी विंटेज’ची स्थापना करत फॅशन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. जरी अनेक लोक गॅब्रिएलाला अर्जुन रामपालची पार्टनर म्हणून ओळखत असले, तरी तिचा प्रवास दाखवतो की तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
