डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले की, हिवाळ्यात लोक पाणी कमी पितात. त्यामुळे रक्त घट्ट होण्याचे आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका असतो. तसेच हिवाळ्यात शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे स्नायूंची क्रिया मंदावते आणि रक्तप्रवाहावर परिणाम होतो. अशा परिस्थितीतही रक्ताच्या गाठी होण्याचा धोका असतो. तसंच थंडीमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयावर ताण येतो आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो, असं डॉ. जाधव यांनी सांगितलं.
advertisement
पुन्हा डोकं वर काढतोय महारोग, पुणे विभागातून धडकी भरवणारी आकडेवारी समोर
काय काळजी घ्याल?
हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.





