TRENDING:

टायगर श्रॉफसोबतचा ब्रेकअप, दिशा पटानी 5 वर्षांनी लहान सिंगरच्या प्रेमात! हातात धरला हात अन्... VIDEO

Last Updated:

Disha Patani Video : टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानीचे नाव जिम ट्रेनर अलेक्झांडरसोबत जोडले गेले होते. मात्र दोघांनीही आपल्या नात्याला नेहमीच मैत्रीचं स्वरूप दिलं. आता मात्र अभिनेत्री एका नव्या व्यक्तीसोबत रोमँटिक अंदाजात दिसली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती एक प्रसिद्ध सिंगर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Disha Patani : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. दिशाचं नाव टायगर श्रॉफसोबत जोडलं गेलं होतं. त्यांनी अधिकृतरित्या या नात्याची कधीही कबुली दिली नाही. पण 2022 मध्ये त्यांच्या विभक्त झाल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. आता या कथित ब्रेकअपनंतर चार वर्षांनी दिशा पटानी पुन्हा एकदा प्रेमात पडली असल्याचं समोर आलं आहे. टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानीचे नाव जिम ट्रेनर अलेक्झांडरसोबत जोडले गेले होते. मात्र दोघांनीही आपल्या नात्याला नेहमीच मैत्रीचं स्वरूप दिलं. आता मात्र अभिनेत्री एका नव्या व्यक्तीसोबत रोमँटिक अंदाजात दिसली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती एक प्रसिद्ध सिंगर आहे. या सिंगरसोबत आता तिचं नाव जोडलं जात आहे.
News18
News18
advertisement

उदयपूर ट्रिप ठरली चर्चेचं कारण

दिशा पटानी नुकतीच उदयपूरला कृति सेननची बहीण नूपुर सेनन आणि सिंगर स्टेबिन बेन यांच्या लग्नासाठी गेली होती. यावेळी तिला तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री मौनी रॉय आणि तिचा पती सूरज नांबियार यांच्यासोबत उदयपूर विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. मात्र या सगळ्यात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते दिशासोबत पंजाबी सिंगर तलविंदरची उपस्थिती.

advertisement

मास्कमध्ये दिसला तलविंदर

तलविंदर साधारणपणे सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा दाखवत नाही. विमानतळावरही तो फेस मास्क घालूनच दिसतो. स्टेजबाहेर तो आपली ओळख लपवून ठेवतो. आता दिशा पटानी आणि तलविंदर या दोघांना एकत्र टर्मिनलमध्ये एन्ट्री करताना पाहिलं गेलं आहे. यावेळी दिशा त्यांला बोर्डिंग पासशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यात मदत करताना दिसली. दरम्यान CISF वेरिफिकेशनदरम्यान तलविंदरना थोड्या वेळासाठी आपला चेहरा दाखवावा लागला. मुंबईत पोहोचल्यानंतरही दोघांचं वागणं चर्चेचा विषय ठरलं. विमानतळावर तलविंदर दिशा पेक्षा थोडे पुढे चालताना दिसला, ज्यामुळे ते एकत्र फोटो काढून घेणं टाळत असावेत असं वाटलं. बाहेर पडताना त्यांनी मौनी रॉयला मिठी मारली, यावरून ते दिशाच्या फ्रेंड सर्कलमध्येही चांगलेच मिसळले असल्याचं स्पष्ट झालं.

advertisement

दिशा पटानी किंवा तलविंदर यांच्याकडून अद्याप त्यांच्या नात्याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. याआधी दिशाला गोव्यात अभिनेता अरशद वारसीसोबतही पाहिलं गेलं होतं, जिथे ती एका मिस्ट्री मॅनसोबत कारमध्ये बसलेली दिसली होती. तेव्हाही तो व्यक्ती तलविंदर असावा असा अंदाज लावण्यात आला होता, पण ओळख निश्चित होऊ शकली नव्हती.

advertisement

कोण आहे तलविंदर?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
सर्व पहा

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमधील चर्चित नावांपैकी तलविंदर आहे. ‘गॅलन 4’, ‘पल पल’, ‘हसीन’, ‘युअर आयज’, ‘तू’, ‘विशेज’ आणि ‘ख्याल’ अशा अनेक हिट गाण्यांसाठी तो ओळखला जातो. नुकतेच त्याने कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्या ‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटातील ‘तेनू ज्यादा मोहब्बत’ या गाण्याला आवाज दिला होता. तलविंदर नेहमीच आपला चेहरा लपवून ठेवतात आणि मास्क घालूनच दिसतात; त्यांना आपली ओळख लोकांसमोर आणायची नसते. दिशासोबत असताना मात्र पहिल्यांदाच त्यांचा चेहरा लोकांसमोर आला आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
टायगर श्रॉफसोबतचा ब्रेकअप, दिशा पटानी 5 वर्षांनी लहान सिंगरच्या प्रेमात! हातात धरला हात अन्... VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल