TRENDING:

वाढदिवसाच्या 14 दिवसांनी झाला दिशा सालियानचा मृत्यू; 'त्या' रात्री तिच्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

Last Updated:

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात चर्चेत आलेलं नाव म्हणजे दिशा सालियान. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार आहे. पण दिशा कोण होती आणि तिच्यासोबत नेमकं घडलं तरी काय जाणून घ्या सविस्तर माहिती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 12 डिसेंबर : सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची आता सखोल चौकशी होणार आहे. सरकारकडून याप्रकरणी नुकतंच एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने पोलिसांना लेखी आदेश जारी केले आहेत. अतिरिक्त आयुक्त उत्तर विभाग यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे.
दिशा सालियान
दिशा सालियान
advertisement

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात चर्चेत आलेलं नाव म्हणजे दिशा सालियान. दिशा सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर होती. दिशा सालियनचा 2020 मध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 8 जून 2020 ला मुंबईमध्ये घराच्या बालकनीमधून खाली पडून दिशाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद केली होती. पण सुशांतच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा नव्यानं तपास झाला.

advertisement

26 मे 1992 रोजी मुंबईत जन्मलेल्या दिशा सालियानला तिच्या मृत्यूपूर्वी फक्त फिल्मी वर्तुळाशी संबंधित लोकच ओळखत होते, परंतु तिच्या मृत्यूनंतर तिच्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यात दिशाची चर्चा होऊ लागली. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर या चर्चांना वेग आला. दिशाला सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर असण्यासोबतच तिने भारती सिंग आणि वरुण शर्मा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबतही काम केले होते.

advertisement

'माझी रात्रीची झोप उडाली...'; Animal नंतर कसं बदललंय आयुष्य, Tripti Dimriनं सांगितला अनुभव

दिशाचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले आहे. दादर पारसी युथ असेंब्ली हायस्कूल, मुंबई येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. यानंतर त्यांनी आरडी नॅशनल कॉलेज आणि डब्ल्यूए सायन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. दिशाच्या आत्महत्येमागे, ती आर्थिक संकटाशी झुंज देत होती, त्यामुळे तिने हे भयानक पाऊल उचलले असा दावा करण्यात आला.

advertisement

दिशाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तिच्या पालकांबद्दल फारशी माहिती नाही. त्याच्या भावाचे नाव विजय सालियन असून तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. याशिवाय दिशाच्या आयुष्यात तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड रोहन राय होता. दोघांची एंगेजमेंटही झाली होती. असे म्हटले जाते की दिशा आणि रोहन लवकरच लग्न करणार होते, परंतु दिशाने आत्महत्या करत स्वप्न मोडलं.

advertisement

मृत्यूपूर्वी दिशा सालियनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ घटनेच्या तासाभरापूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दिशा तिच्या बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. ती गाणं गुणगुणत त्यावर नाचतही होती. दिशाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये ती कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली दिसली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्हिडिओनंतर दिशाने लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणी अंकिताला फोन केला होता, ज्यात ती इमोशनल झाली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा मोठी वाढ, कांदा आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

दिशाचा बॉयफ्रेंड रोहनच्या म्हणण्यानुसार, 'त्या दिवशी दिशाला शेवटचा कॉल तिच्या शाळेतील मित्राने केला होता. त्यानंतर दिशा मास्टर बेडरूममध्ये गेली. काही मिनिटांनी मी दरवाजा ठोठावला पण तिने दरवाजा उघडला नाही. मात्र, खोली बंद नव्हती. मी दार उघडले तर सर्व बेडवर दारू पसरलेली होती. मला वाटले की दिशा काही वेळाने परत येईल. ती परत न आल्याने आम्ही बेडरूम आणि बाथरूममध्ये शोध घेतला. यानंतर जेव्हा मी खिडकी उघडली तेव्हा मी खाली पाहिले तर दिशाचा पायजमा जमिनीवर पडलेला दिसला.' असं त्याने सांगितलं होतं.

मराठी बातम्या/मनोरंजन/
वाढदिवसाच्या 14 दिवसांनी झाला दिशा सालियानचा मृत्यू; 'त्या' रात्री तिच्यासोबत नेमकं घडलं तरी काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल