'माझी रात्रीची झोप उडाली...'; Animal नंतर कसं बदललंय आयुष्य, Tripti Dimriनं सांगितला अनुभव

Last Updated:

रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या अ‍ॅनिमल सिनेमात तृप्तीनं जोया नावाची छोटी भूमिका साकारली आहे. तृप्तीचा स्क्रिन टाइमही फार कमी आहे.

Tripti Dimri animal
Tripti Dimri animal
मुंबई, 12 डिसेंबर : कलाकारांना त्याचं करिअर बदलणारा एक तरी सिनेमा नक्कीच वाट्याला येतो. एका हीट सिनेमानंतर मात्र त्या कलाकारांना पुन्हा मागे वळून पहावं लागत नाही. अभिनेत्री तृप्ती डिमरीबरोबर देखील असंच काहीस झालं आहे. अ‍ॅनिमल सिनेमामुळे अभिनेत्री तृप्ती डिमरीला कमालीची लोकप्रियता मिळाली आहे. पण या लोकप्रियतेमुळे तृप्तीची मात्र रात्रीची झोप उडाली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तृप्तीनं अ‍ॅनिमल सिनेमात काम केल्यामुळे माझी रात्रीची झोप उडाली आहे असं सांगितलं. तृप्तीनं नेमकं काय म्हटलं आहे ? पाहूयात.
रणबीर कपूर प्रमुख भूमिकेत असलेल्या अ‍ॅनिमल सिनेमात तृप्तीनं जोया नावाची छोटी भूमिका साकारली आहे. तृप्तीचा स्क्रिन टाइमही फार कमी आहे. पण थोड्या काळासाठी आलेल्या तृप्तीनं मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. सिनेमानं रिलीजच्या दहा दिवसात 750 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तृप्तीनं सिनेमात अभिनेता रणबीर कपूरबरोबर सेक्स सीन्स दिले आहेत. ज्यामुळे तृप्ती चांगलीच चर्चेत आलीये. तिच्या एकीकडे टीका देखील होतेय तर दुसरीकडे तिचं कौतुक देखील केलं जातंय. अ‍ॅनिमलमुळे तिची सोशल मीडिया फॉलोविंग वाढली आहे. तिच्याकडे अनेक नवे प्रोजेक्ट येऊ लागलेत. पण या सगळ्यामुळे तिची रात्रीची झोप उडाल्याचं ती म्हणतेय.
advertisement
advertisement
अ‍ॅनिमल फेम तृप्तीनं पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, माझा फोन रात्रंदिवस वाजत असतो. माझी रात्रीची झोप उडाली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपलं जर कोणी कौतुक करत असेल तर ते मेसेज वाचण्याची एक्साइटमेंट फार मोठी असते. मी रात्रभर सगळ्या कमेंट्स वाचत असते. सगळं खूप छान सुरू आहे. मला खूप प्रेम मिळतंय आणि हा खूप सुंदर अनुभव आहे.
advertisement
अ‍ॅनिमल सिनेमाआधी तृप्तीनं लैला मजनू, कला आणि बुलबुल सारख्या सिनेमात काम केलं आहे. त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसात ती मेरे महबूब मेर सनम आणि विक्की विद्या या सिनेमातही दिसणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माझी रात्रीची झोप उडाली...'; Animal नंतर कसं बदललंय आयुष्य, Tripti Dimriनं सांगितला अनुभव
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement