2016 साली ममता कुलकर्णी विरोधात NDPS ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल झाला. ठाणे परिसरात दाखल झालेल्या या गुन्ह्यात ममतावर आरोप होता सोलापुरच्या अॅव्हान लाईफ सायन्स कंपनीतून केनियाला इफिड्रेन पावडरच्या स्मगलिंगचा. केनियातील एका हॉटेलमध्ये या तस्करीचा कट रचण्यात आला. या मिटिंगमध्ये ममता कुलकर्णी विकी गोस्वामी आणि मनोज जैन या दोघांसोबत मीटिंगला हजर होती असा दोषारोपपत्रात सांगण्यात आलं. याप्रकरणी नंतर आणखी काही जणांना अटक झाली. त्यांच्याकडून एक किलो इफिड्रेन पावडर जप्त करण्यात आली.
advertisement
( 2 लग्न मोडली, 11 वर्ष छोट्या अभिनेत्यासोबत जोडलं नाव; आता सिंगल आयुष्य जगते 'ही' अभिनेत्री! )
फक्त मिटिंगला हजर राहण्यानं दोषारोप सिद्ध होत नसल्याचं सांगत मुंबई हायकोर्टानं आता ममता कुलकर्णी निर्दोष ठरवंय. पण, यशस्वी अभिनेत्री ते ड्रग्ज तस्करीच्या आरोपांपर्यतचा ममताचा प्रवास मोठा धक्कादायक आहे. ममता कुणकर्णी ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात येण्याआधीच अंडरवर्ल्ड डॉन्सच्या जाळ्यात अडकली होती..
यातला पहिला किस्सा आहे १९९२ सालचा. बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या ममता कुलकर्णीवर एकेकाळच्या दाऊद गँगचा डॉन छोटा राजनची नजर पडली आणि पुढे ममताला काही फिल्म मिळाव्यात यासाठी राजननं थेट निर्मात्यावर दबाव टाकल्याच्या बातम्या येऊ लागल्या.
असाच आणखी एक किस्सा 1999 सालच्या आलेल्या चायना गेट चित्रपटाबाबतही सांगितला जातो. 'घातक' या चित्रपटातील 'मारा रे' या गाण्यात ममताचा स्पेशल अपिअरन्स होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होतं. राजकुमार यांनी 1999 मध्ये प्रदर्शित झालेला 'चायना गेट' हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी ममताला या चित्रपटासाठी साइन केलं.
खरं तर राजकुमार कास्टिंगवर खूश नव्हते आणि ते नायिका बदलण्याच्या विचारात होते.राजकुमार यांनी ममताला चित्रपटातून काढून टाकताच त्यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनकडून धमकीचे फोन येऊ लागले. छोटा राजनकडून धमक्या आल्यानंतर राजकुमार यांनी ममताला चित्रपटात कायम ठेवलं.