मुंबई - दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. प्रकाशाचा, चैतन्याचा या उत्सवाची प्रत्येकजण वाट पाहतो. सध्या प्रत्येकजण दिवाळी साजरी करण्यात मग्न आहे. सर्वसामान्यांपासून मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळींही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरा करत आहेत. याच निमित्ताने अभिनेता प्रणव रावराणे याने यंदाची दिवाळी कशी साजरा केली, हे जाणून घेऊयात.
लोकल18 च्या टीमने त्याच्याशी विशेष संवाद साधला. मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू तरुण प्रतिभांपैकी एक आणि दुनियादारी सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून सॉरी या कॅरॅक्टरने अभिनेता प्रणव रावराणे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. प्रणव रावराणे हा प्रतिभावान आणि बहुमुखी अभिनेता आहे. तो चित्रपट आणि टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'दुनियादारी ' मधील ' सॉरी ' ही व्यक्तिरेखा साकारताना त्याच्या प्रतिभेने त्याला लोकप्रिय केले. यासोबतच त्याने भागम भाग, अबन्नी उडवला बार, धव मन्या धव, हिप हिप हुर्रे, 22 जून, व्हॉट ॲन आयडिया, हृदयनाथ आणि चंडी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिकाही साकारल्या आहेत.
advertisement
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने अनोख्या पद्धतीने साजरी केली दिवाळी, VIDEO
केवळ चित्रपट आणि नाटकच नाही तर प्रणव रावराणे हा थिएटर आर्टिस्टही आहेत. 'आपण याना पाहिलत का?', 'सोहळा गोश्त प्रेमाची', 'लगे रहो राजाभाई', 'एक डॉन तीन चार', 'तीन जीव सदाशिव', 'सथ नमस्ते', 'वर्याची वरात', 'सेलिब्रेटी वस्त्रहरण' अशा अनेक मराठी नाटकांत त्याने भूमिका केल्या आहेत. त्याचे वासुची सासू हे नाटक सध्या गाजत आहे. यासोबतच त्याने मराठी मालिकांमध्येही काम केले आहे. ते आहेत: गप्पागोष्टी, हस्यासमरत, फू बाई फू, टोकीज तडका, भैरोबा, अमाबत देव. ट्रिंग ट्रिंग आणि जाने भी दो हे त्याचे काही हिंदी लघुपट आहेत.
सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा दिवाळी सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. त्याचप्रमाणे दिवाळी निमित्त यांच्याशी गप्पा साधताना यंदाची दिवाळी या अभिनेत्रीला खूप खास गेली आहे, असे त्याने म्हटले. यामागचे कारण असे की, या वर्षात त्याने अनेक नवीन प्रोजेक्ट केले आहेत. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे शूटिंग केले, त्यानंतर वस्त्रहरण नाटकांचे प्रयोगही आखलेले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी पॉवर पॅक धमाकेदार म्हणून अनेक कामाच्या गोष्टींनी रंगली आहे, असे अभिनेता प्रणव रावराणे याने यावेळी सांगितले. यावेळी त्याने त्याच्या सर्व चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
दिवाळीनिमित्त काही मित्रांसोबतचे अविस्मरणीय क्षणांबाबत तो म्हणाला की, दिवाळी दरम्यान शॉपिंग करताना त्याच्या 3 मित्रांनी एकच वेळेत वेगवेगळ्या ठिकाणाहून सेम रंगाचे शर्ट परिधान केले होते. यावरून त्याने असे तात्पर्य सांगितले की, मैत्रीची पकड जेवढी घट्ट असते, तेवढी त्या मैत्रीचे विचारही तेवढेच मिळते जुळते, घट्ट असले पाहिजेत.