‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने अनोख्या पद्धतीने साजरी केली दिवाळी, VIDEO

Last Updated:

celebrity diwali 2024 - स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’  या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने विशेष छाप सोडली आहे आणि अशीच एक छाप एका अभिनेत्रीने सोडली आहे.

+
अभिनेत्री

अभिनेत्री पुनम चांदोरकर

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई - दिवाळी या सणाला प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्यात दिवाळी हा प्रकाशाचा, चैतन्याचा उत्सव आहे. सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून मनोरंजनविश्वातील कलाकार मंडळींही मोठ्या उत्साहाने सण साजरे करत असतात. यानिमित्ताने अभिनेत्री पुनम चांदोरकर यांनी यंदाची दिवाळी कशी साजरी केली, याचबाबत लोकल18 टीमचा हा आढावा.
सामान्यांप्रमाणे सेलिब्रिटीसुद्धा दिवाळी सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतात. ते ही मोठ्या उत्साहाने दिवाळी सेलिब्रेट करतात. त्यामुळे आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री पुनम चांदोडकर यांनी यंदाची दिवाळी नवीन काही गोष्टी शिकवण्यास घेऊन सेलिब्रेट केली आणि त्याचबरोबर दिवाळी साजरी करतानाचे त्यांचे अविस्मरणीय क्षण कोणते आहेत तेही त्यांनी सांगितले.
advertisement
दिवाळीनिमित्त यांच्याशी गप्पा साधताना यंदाची दिवाळी त्या कशा पद्धतीने साजरा करत आहेत, याबाबत त्यांनी सांगितले. लोकल18 शी बोलताना त्या म्हणाल्या की, यंदाही ही दिवाळी खूप खास गेली आहे. या वर्षात त्यांनी अनेक गोष्टी शिकून त्या पुरेपूर आत्मसात ही केल्या आहेत.
advertisement
त्यांच्या अविस्मरणीय दिवाळीबद्दल सांगितले की, पूर्वीची दिवाळी ही खूप खास असायची. तेव्हा कोणाकडे फोन नसल्याने प्रत्येकाला भेटून शुभेच्छा दिल्या जायच्या आणि त्यातच प्रतेकाच्या घरात जावून फराळ चाखण्याचा आनंद लुटून घेतला जायचा. अशा काही दिवाळी निमित्त गमती त्यांनी सांगितल्या.
advertisement
प्रेक्षकांच्या मनात केले घर -
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’  या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या दमदार अभिनयाने विशेष छाप सोडली आहे आणि अशीच एक छाप अभिनेत्री पुनम चांदोरकर यांनी सोडली आहे. "विशाखा आत्या" या नावाने "नणंद"ची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांचा मनात घर केले.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने अनोख्या पद्धतीने साजरी केली दिवाळी, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement