अनन्या म्हणाली, "फराहकडे माझ्या वडिलांचा टी-शर्ट आहे" हे ऐकून ट्विंकल शॉक झाली. तिने लगेचच मजेत विचारलं की, "तू रात्री चंकी पांडेचे टी-शर्ट शिवतेस का?" यावर एकच हशा पिकला. त्यानंतर अनन्याने त्या टी-शर्टमागील एक मजेदार किस्सा शेअर केला.
advertisement
अनन्याने सांगितले की, एकदा फराह खान त्यांच्या घरी आली होती. त्या वेळी तिचा कुत्रा आजारी होता. त्याला नीट दिसत नव्हतं. तो घरात कुठेवी टॉयलेट करत होता. तेव्हा तिथे फराह फोनवर बोलत होती आणि चुकून तिचा पाय कुत्र्याच्या टॉयलेटवर पडला आणि ती जमिनीवर पडली.
अनन्या म्हणाली, "हे सगळं आमच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये दिसलं." फराह खानने सांगितले की, चंकी पांडेने ती व्हिडिओ क्लिप त्याच्या फॅमिली व्हॉट्स एँप चॅटवर पाठवली. मी नंतर अंघोळ केली आणि चंकीचा शर्ट घातला.
फराह खान म्हणाली, "तो टी-शर्ट फक्त 50 रुपयांचा होता, गोव्यातल्या बागा बीचवर मिळणाऱ्या टी-शर्टसारखा. आता तो आमच्या घरात पुसण्यासाठी वापरला जात असावा" हे ऐकून ट्विंकल आणि काजोल दोघीही हसून लोटपोट झाल्या. फराह म्हणाली की चंकी अजूनही आपला टी-शर्ट मागत आहे.
हा मजेशीर किस्सा आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी कमेंट्स करत "फराह खान म्हणजे एंटरटेनमेंटची राणी" असं म्हटलं आहे. दरम्यान टु मच टॉकच्या या एपिसोडमध्ये ट्विंकल आणि काजोल यांनी पुन्हा एकदा धम्माल केली आहे. त्यांच्या नव्या बोल्ड स्टेटमेन्टमुळे दोघी पुन्हा चर्चेत आल्यात. "वयस्कर लोक त्यांचे अफेअर्स लहान लोकांपेक्षा चांगले लपवतात. मोठे लोक यात पारंगत असतात, त्यांची खूप प्रॅक्टिस झालेली असते", असं ट्विंकल म्हणाली. तिच्या या स्टेटमेन्टची सध्या खूप चर्चा होतेय.
