तक्रारीनुसार, 2022 मध्ये त्या अभिनेत्रीची हेमंतशी ओळख झाली होती. हेमंतच्या 'रिची' या चित्रपटात तिला मुख्य भूमिकेसाठी साइन करण्यात आलं होतं. या करारानुसार तिला 2 लाख मानधन ठरवण्यात आलं होतं. ज्यापैकी 60 हजार रक्कम अॅडव्हान्स म्हणून देण्यात आली होती.
( दहावीतच शिक्षण सोडलं, 15 व्या वर्षी मुंबई गाठली; अभिनेता आज करतोय OTT वर राज्य )
advertisement
मात्र चित्रपटाचं शूटींग लांबल्याने हेमंतने अभिनेत्रीला अश्लील कपडे परिधान करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अभिनेत्रीने हेही सांगितले की, हेमंतने तिच्याशी अश्लील वर्तन केलं आणि मुंबईच्या दौऱ्यातही तिला त्रास दिला. तिने त्याच्या मागण्या नाकारल्यानंतर त्याने तिला गुंडांकडून धमकावल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
त्याचप्रमाणे शूटींग पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पैसे देण्यासाठी हेमंतने दिलेला चेक बाउन्स झाला. इतकंच नव्हे तर त्याने तिच्या संमतीशिवाय चित्रपटातील अश्लील सीन सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोपही अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या या तक्रारी आणि आरोपांनंतर राजाजीनगर पोलिसांनी हेमंतला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवलं असून पुढील तपास सुरू आहे.