यूएस-कॅनडा टूरमधील व्हिडिओ व्हायरल!
गौरव गुप्ताचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ त्याच्या यूएस-कॅनडा टूरमधील आहे. त्याने स्वतःच हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की, गौरव गुप्ताला जेव्हा कळतं की त्याच्या प्रेक्षकांमध्ये कोणीतरी पाकिस्तानहून आलं आहे, तेव्हा तो त्याला 'रोस्ट' करायला सुरुवात करतो.
पाकिस्तानी फॅनला 'रोस्ट' केलं!
व्हिडिओमध्ये गौरवने म्हटलं, "पाकिस्तानी पण आले आहेत? कुठे आहेत पाकिस्तानी?" हे ऐकताच प्रेक्षकांमधून काहीजण 'सिंदूर-सिंदूर' असे ओरडू लागतात. गौरव पुढे म्हणतो, "भाई, तुमच्यामध्ये खूप दम आहे की तुम्ही इथे आलात." यावर गौरव पुढे म्हणतो, "मला वाटलं होतं कलाकार बॅन आहेत, काही हरकत नाही प्रेक्षक तर अलाऊड आहेत." त्यानंतर गौरव गुप्ता त्याला म्हणतो, "चला मग तुम्ही हनुमान चालीसा म्हणा आता. म्हणा, म्हणा, म्हणा..." यावर तो चाहता म्हणतो, "भाऊ, मी शिकून आलोय." यावर गौरव 'ठीक आहे भाई' असं म्हणतो.
advertisement
'काश्मीर'वरून 'नाही मिळणार'चा टोला!
गौरव पुढे विचारतो, "भाई, तुमचं नाव काय आहे?" तो चाहता आपलं नाव सांगताच गौरव त्याला 'कोड नेम' असं विचारतो. यानंतर गौरव त्या त्या प्रेक्षकाला विचारतो की, "तुला माझा शो समजतोय का?" यावर तो चाहता 'हो, सगळं समजतंय' असं उत्तर देतो. त्यावर गौरव गुप्ता त्याला जबरदस्त टोला लगावत म्हणतो, "तर मग तुला हे समजत नाहीये, नाही मिळणार तुला. इतक्या वर्षांपासून आम्ही म्हणत आहोत नाही मिळणार, नाही मिळणार, तरीही तुम्ही येता!" गौरवचा हा टोला अर्थातच काश्मीरच्या मुद्द्यावरून होता, हे प्रेक्षकांना लगेचच समजलं आणि एकच हशा पिकला.
या व्हिडिओवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. एका चाहत्याने लिहिलं, "बदला बनियानेच घेतला आहे." दुसऱ्याने लिहिलं, "भाई, काय मजे घेतल्या आहेत!" गौरव गुप्ताच्या या रोस्टिंगमुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.