गौतमी पाटीलचे कार्यक्रम म्हणजे चांगलीच गर्दी होणार हे समीकरण ठरलेलं आहे. अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात तरूणांची हुल्लडबाजी चालते. बऱ्याच वेळा कार्यक्रमात मारामारी, चेंगरा चेंगरी होते आणि निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणताना पोलिसांच्या आणि कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांना देखील डोकेदुखी होऊन बसते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गौतमी पाटीलचे कार्यक्रम कोल्हापूरात ठेवू नयेत अशा स्पष्ट सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. कोल्हापूरमधील करवीर आणि राधानगरी येथील गावातील कार्यक्रमांना परवानगी नाकारली नाकारण्यात आली आहे. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडतील असे कार्यक्रम ठेऊ नयेत, असे स्पष्ट आदेश देण्यात आलेत.
advertisement
हेही वाचा - Parineeti Raghav Wedding: राघव चड्ढापेक्षा 10 पट जास्त आहे परिणीतीची नेटवर्थ! कशी झाली दोघांची भेट?
नुकताच दहीहंडी उत्सव साजरा झाला. दहीहांडीनिमित्तानं देखील अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गौतमीला मुंबईतील कार्यक्रमांचं देखील खास आमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबईतील बोरिवरी आणि मुलुंड येथील मानाच्या दहीहंडीला गौतमी आली होती. दहीहंडी उत्सवात गौतमीनं 'पाव्हन जेवला काय?', म्हणत मुंबईच्या प्रेक्षकांवरही मोहिनी घातली.
दरम्यान गौतमी पाटीलच्या मुंबईतील कार्यक्रमांनंतर बरंचस ट्रोलिंग झालं. हदीहंडी कार्यक्रमात डान्स करण्याच्या तीन दिवस आधीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. धुळ्यामध्ये गौतमीचे वडील बेवारस परिस्थितीमध्ये आठळले होते. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वडील बेवारस अवस्थेत सापडल्याची माहिती मिळाल्यानंतर गौतमीनं वडिलांना मदत देखील केली होती. वडिलाच्या मृत्यूनंतर त्यांना अखेरचा निरोप देताना गौतमी अत्यंत भावुक झाली होती.