'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेला ओंकार राऊत आणि गौतमी पाटील या दोघांचं काय कनेक्शन असू शकतं? सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक व्हिडिओ वणव्यासारखा पसरला असून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. व्हिडिओमध्ये गौतमी चक्क नववधूच्या रूपात गृहप्रवेश करताना दिसतेय आणि तिने ओंकार राऊतसाठी एक हटके उखाणाही घेतला आहे.
ओंकारसाठी गौतमीचा उखाणा
advertisement
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, गौतमी पाटील नववधूच्या थाटात उभी आहे आणि घराचे उंबरठा ओलांडण्यापूर्वी तिला 'नाव' घेण्याचा आग्रह केला जातो. त्यावर लाजत-मुरडत गौतमी म्हणते, "ना वायफाय ना इंटरनेट, गच्चीवर झाली आमची पहिली भेट... ओंकार रावांचं नाव घेते आमची जोडी एकदम परफेक्ट!" हा व्हिडिओ पाहिल्यावर "ओंकार आणि गौतमीने खरंच लग्न केलं की काय?" असा प्रश्न चाहत्यांना पडला. ओंकारला अशा रूपात पाहून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. मात्र, या गोंधळानंतर गौतमीने स्वतःच एका कमेंटमध्ये खुलासा केला की, हे खरं लग्न नसून एका आगामी प्रोजेक्टचं शूटिंग आहे.
'गच्ची' गाण्याचं नवं व्हर्जन
२०१७ मध्ये तुफान गाजलेलं 'गच्चीवरून कशी दिसते' हे गाणं आता नवीन ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्याच्या रिमेकसाठी गौतमी पाटील आणि ओंकार राऊत यांची जोडी निवडण्यात आली आहे. या म्युझिक व्हिडिओच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. गाण्याच्या प्रमोशनसाठीच हा मजेशीर लग्नाचा व्हिडिओ तयार करण्यात आला होता.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने ओंकार राऊतला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली असली, तरी त्याचा प्रवास खूप जुना आहे. 'फ्रेशर्स' आणि 'फुलपाखरू' सारख्या मालिकांपासून सुरू झालेला त्याचा प्रवास 'टाईमपास ३' सारखे चित्रपट आणि 'काळे धंदे', 'इन्स्पेक्टर झेंडे' सारख्या वेब सिरीजपर्यंत पोहोचला आहे. आता गौतमी पाटीलसोबतचा हा रोमँटिक-म्युझिक व्हिडिओ त्याच्या करिअरमध्ये एक वेगळा तडका देणार, हे नक्की.
