TRENDING:

लग्नासाठी ज्वेलरी घ्यायची? ज्वेलरी बॉक्स मिळतोय फक्त 120 रुपयांपासून, मुंबईत हे आहे लोकेशन

Last Updated:

विशेष म्हणजे केवळ 120 रुपयांपासून विविध प्रकारचे ज्वेलरी बॉक्स येथे उपलब्ध झाले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरात ज्वेलरी ठेवण्यासाठी लागणारे आकर्षक आणि मजबूत बॉक्सची मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू झाली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे केवळ 120 रुपयांपासून विविध प्रकारचे ज्वेलरी बॉक्स येथे उपलब्ध झाले आहेत.
advertisement

या दुकानात बँगल बॉक्स 350 रुपयांपासून उपलब्ध आहेत तर इअरिंग बॉक्स 150 ते 250 रुपयांदरम्यान मिळत आहेत. वॉच बॉक्स 550 रुपयांना उपलब्ध असून नेकलेस बॉक्स केवळ 120 रुपयांपासून सुरू होतात. विविध आकार, रंग आणि आकर्षक डिझाईनमुळे हे बॉक्स ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ज्वेलरी सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत आणि टिकाऊ मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दागिने सुरक्षित राहतात तसेच त्यांचे सादरीकरण अधिक उठावदार दिसते.

advertisement

Success Story : कॉलेज सांभाळत व्यवसायाची वाट, सलोनीचा चीजकेक स्टॉल हिट, महिन्याची कमाई तर पाहाच

सध्या लग्नसराईचा हंगाम आणि विविध सणांच्या पार्श्वभूमीवर ज्वेलरी बॉक्सची मागणी वाढली आहे. विक्रेत्यांच्या मते कमी किमतीत उत्तम दर्जा मिळत असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. घाऊक दरात उपलब्धतेमुळे छोट्या व्यावसायिकांनाही फायदा होत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ज्वेलरी बॉक्स मिळतोय फक्त 120 रुपयांपासून, मुंबईत हे आहे लोकेशन
सर्व पहा

हे दुकान अब्दुल रहमान स्ट्रीटवर ‘विनस बेल्ट’ या दुकानाच्या शेजारी असून येथे विविध प्रकारचे ज्वेलरी बॉक्स एकाच ठिकाणी पाहायला मिळतात. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या डिझाईनचे आणि रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. किफायतशीर दर, आकर्षक डिझाईन आणि मजबूत बांधणी यामुळे या ज्वेलरी बॉक्सची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हाला ज्वेलरी सुरक्षित आणि व्यवस्थित ठेवायची असेल तर कमी खर्चात हा उत्तम पर्याय आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लग्नासाठी ज्वेलरी घ्यायची? ज्वेलरी बॉक्स मिळतोय फक्त 120 रुपयांपासून, मुंबईत हे आहे लोकेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल