गिरिजा ओक ही प्रसिद्ध अभिनेते गिरिश ओक यांची मुलगी आहे. मात्र तिनं स्वत:ची एक वेगळी ओळख इंडस्ट्रीत तयार केली. नाटक, सिनेमा, वेब सीरिज अशा अनेक माध्यमांमध्ये ती काम करतेय.
advertisement
काही दिवसांपासून अनेक मुलाखतींमध्ये गिरिजाच्या वैयक्तिक आयुष्याने अनेक पैलू उलगडले. गिरिजाचं बालपण, तिच्या आई-वडिलांचं वेगळं होणं. आई-वडिलांचं दुसरं लग्न अशा अनेक गोष्टी नव्यानं कळल्या.
पण तुम्हाला माहिती आहे का गिरिजा ओक ही एकटी नसून तिला भावंड देखील आहेत. गिरिजाला दोन भाऊ - बहिण आहेत. एक भाऊ गिरिजाच्याच वयाचा आहे. तर एक बहिण गिरिजापेक्षा लहान आहे.
गिरिजाच्या आईने म्हणजेच पद्मश्री फाटक यांनी गिरिष ओक यांच्यासोबत डिवोर्स घेतल्यानंतर संजय पाठक यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. संजय पाठक यांना दोन मुलं होती.
एका मुलाखतीत बोलताना गिरिजा म्हणाली, "मला भाऊ आणि बहिण आहेत. मेहुल माझ्या भावाचं नाव आणि चैताली माझ्या बहिणीचं नाव. दोघांची लग्न झाली आहेत. मेहूलच्या बायकोचं नाव अपूर्वा आहे ती अॅडव्होकेट आहे. चैतालीचा नवरा अजिंक्य एका मोठ्या कॉर्पोरट ऑफिसमध्ये आहे. सगळे आपापल्या क्षेत्रात फार छान काम करत आहेत."
दुसऱ्या वडिलांबद्दल गिरिजा म्हणाली, "त्यांना नाटक, सिनेमांची खूप हौस होती. ते माझ्या प्रत्येक नाटकाला आवर्जून यायचे. त्यांना माझं खूप कौतुक होतं."
सावत्र भावंडांविषयी बोलताना गिरिजा म्हणाली, "आईच्या दुसऱ्या लग्नामुळे मला मेहुल आणि चैताली ही भावंडं मिळालय पण आमच्यावर 'बहीण-भाऊ' होण्याचा दबाव कधीच नव्हता. आम्ही एकमेकांना वेळ दिला आणि हे नातं अगदी सहज, नैसर्गिकरित्या मैत्रीत बदलत गेलं."
"आज आम्ही इतके जवळ आहोत की, मुद्दाम 'सावत्र' शब्दाचे जोक्स करून लोकांची गंमत बघतो. रक्ताचे नसलो तरी, मनाचे बंध मात्र आता सख्ख्यांपेक्षाही घट्ट झाले आहेत."
