TRENDING:

56व्या IFFI फेस्टिव्हलमध्ये 'गोंधळ', 'आता थांबायचं नाय' सहीत आणखी 2 मराठी सिनेमांचीही निवड

Last Updated:

56th International Film Festival of India : भारतीय सिनेसृष्टीसाठी मानाचा समजला जाणारा इफ्फी फेस्टिव्हल लवकरच गोव्यात संपन्न होणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये एक दोन नाही तर चार मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतीय सरकारचा 56 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया ( IFFI ) लवकरच पार पडणार आहे. गोव्यात होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये काही मराठी सिनेमांचीही निवड करण्यात आली आहे. ही मराठी सिनेमांसाठी आनंदाची बाब आहे. 'गोंधळ' आणि 'आता थांबायचं नाय' या दोन मराठी सिनेमांसह आणखी 2 मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. 'इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॅाक सेक्शन' मध्ये या दोन्ही सिनेमांची अधिकृपणे निवड झाली आहे.
News18
News18
advertisement

'गोंधळ' इफ्फी 2025 मध्ये 

पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेला बहुप्रतिक्षित गोंधळ गा मराठी सिनेमाची आंतरराष्च्रीय पातळीवर झळकणार आहे. येत्या 14 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. गोंधळबरोबरच शिवराज वायचळ दिग्दर्शित आता थांबायचं नाय हा सिनेमा इफ्फी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवला जाणार आहे.  या दोन्ही सिनेमांची अभिमाची बाब म्हणजे दोन्ही सिनेमाच्या दिग्दर्शकांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण सिनेमे आहेत. पदार्पणातच दोघांना खूप मोठं यश मिळालं आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची बाब ठरत आहे.

advertisement

( Suraj Chavan Wife : बिग बॉसचा विनर संजनाच्या प्रेमात सायको, कोण आहे सूरज चव्हाणची होणारी बायको? )

'आता थांबायचं नाय' इफ्फी 2025 मध्ये 

'आता थांबायचं नाय' या सिनेमाला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळाली. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटर हाऊसफुल केलं होतं. आता थांबायचं नाय या सिनेमानं एकूण 7.45 कोटींची कमाई केली. BMC मध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या आयुष्यातील सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, रुपा बोरगावकर, आशुतोष गोवारीकर आणि  रोहिणी हट्टंगडी यांच्या महत्त्वाच्या भुमिका आहेत.

advertisement

गोंधळ या सिनेमाविषयी सांगायचं झाल्यास आपल्या मातीत रुजलेल्या परंपरा, लोककला आणि श्रद्धांचा अनोखा संगम दाखवणारा. तसंच नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक ‘गोंधळ’ विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा आहे.  केवळ धार्मिक विधीवर मर्यादित न राहाता मानवी भावना, अंधश्रद्धा, आणि समाजातील बदलणारे दृष्टिकोन यांचाही वेध घेतो.

advertisement

संतोष डावखर दिग्दर्शित 'गोंधळ' या सिनेमात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे कलाकार महत्त्वाच्या भुमिकेत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ती खरंच 'भाग्यलक्ष्मी' होती, पैसा आला! गायीला वाजत गाजत दिला अखेरचा निरोप, VIDEO
सर्व पहा

'आता थांबायचं नाय' आणि 'गोंधळ' या सिनेमाबरोबरच परेश मोकाशी दिग्दर्शित 'मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी' आणि 'दृश्य अदृश्य' या सिनेमाचीही 56 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 'इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॅाक सेक्शन'मध्ये निवड करण्यात आली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
56व्या IFFI फेस्टिव्हलमध्ये 'गोंधळ', 'आता थांबायचं नाय' सहीत आणखी 2 मराठी सिनेमांचीही निवड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल