गोविंदा हा बॉलिवूडचा सुपरस्टार होता. एक काळ असा होता की सामान्य मुलीच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्रीही त्याच्यासाठी वेड्या असायच्या. पण या सगळ्यात गोविंदाने थेट त्याच्या मामाच्या मेहुणीबरोबर गुपचूप लग्न केलं. बराच मोठा काळ त्याने त्याचं लग्न लपवून ठेवलं होतं.
( गोविंदाची प्रॉपर्टी 140 कोटी, पण सुनीता अहुजाची एकूण मालमत्ता किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही)
advertisement
1987मध्ये गोविंदाने त्याच्या मामाची मेहुणी सुनीताबरोबर लग्न केलं. लग्नाची बातमी त्याच्या स्टारडमवर परिणाम करू शकते या कारणामुळे त्याने त्याचं लग्न झालंय हे अनेक वर्ष लपवून ठेवलं होतं. पण लग्नाची बातमी समोर आल्यानंतरही त्याच्या स्टारडमवर कोणताही परिणाम झाला नाही.
गोविंदा हा विरारचा एक सामान्य घरातील मुलगा. इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीच्या काळात तो त्याचा मामा आनंदकडे राहायचा. सुनिता ही आनंदच्या बायकोची बहिण बोती. मामीची बहीण सुनीता देखील त्याच्या घरी येत असे. सुरुवातीला दोघांमध्ये खूप भांडणे होत असत. याचे कारण म्हणजे दोघांचेही स्वभाव वेगळे होते. गोविंदा हा एक शांत देसी स्टाइल मुलगा होता. दुसरीकडे सुनीता ही वांद्र्याची एका हाय प्रोफाइल कुटुंबातून मुलगी होती. दोघांमध्ये भांडणे व्हायची तेव्हा गोविंदाचा मामा आनंद मध्यस्थी करायचे पण दोघांमध्ये एक समान धागा होता तो म्हणजे दोघांनाही डान्स करायला प्रचंड आवडायचा.
दोघांचं भांडण सोडवण्यासाठी आनंद दोघांनाही डान्स कॉम्पिटिशनचा सल्ला द्यायचे. डान्स करता करता दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी गोविंदा करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होता. लग्नाच्या 1 वर्षानंतर 16 जुलै 1988 रोजी तिने नर्मदा या मुलीला जन्म दिला. नर्मदा देखील तिच्या वडिलांप्रमाणेच एक अभिनेत्री आहे.
गोविंदाचं लग्न झालं तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता आणि सुनीता फक्त 18 वर्षांची होती. सिमी ग्रेवालच्या शोमधील मुलाखतीत गोविंदाने सांगितले की, "मला वाटले की कोणीतरी माझे करिअर खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून जेव्हा मला आता माझे लग्न जाहीर करण्यास सांगितले गेले तेव्हा मी ते जाहीर केले नाही. ज्याचा मला पश्चात्ताप आहे."