अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नुकतंच अमोल परचुरे यांच्या 'कॅचअप' चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसोबतची आठवण सांगितली. इतकंच नाही, तर त्यांनी राज आणि शर्मिला यांच्या लग्नात केलेली धमालही सांगितली. त्या म्हणाल्या, "खरं तर, त्यांच्या लग्नाचा सगळा व्यवहार माझ्याच माध्यमातून झाला." राज ठाकरे यांना त्या अत्यंत गोड माणूस असं म्हणाल्या.
advertisement
'...अन् त्याने मला गाडीमधून खाली उतरवलं'
पुढे वंदना यांनी जेव्हा त्यांनी नवी गाडी घेतली होती, तेव्हाचा किस्सा सांगितला. त्यावेळी राज यांनी त्यांना थेट गाडीमधून खाली उतरवलं होतं. वंदना यांनी सांगितलं, "मी एक नवीन गाडी घेतली होती. ती गाडी पार्क करायला घरी घेऊन जात असताना राज ठाकरे शिवाजी पार्कजवळ फेऱ्या मारत होता. थांब! उतर, असं मला तो म्हणाला. मी मग गाडीतून उतरले."
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार! उद्धाटनाच्या दुसऱ्याच दिवशी दहशतवादी हल्ला, भयानक VIDEO
वंदना पुढे म्हणाल्या, "मी त्याला सांगितलं, 'नवीन गाडी आणलीये.' तर तो म्हणाला, 'हो कळलं मला, सगळं प्लास्टिकचे कव्हर घालून फिरतेस. आधी उतर!' इथेच मराठी माणूस दिसतो." राज ठाकरेंनी त्यांना गाडीतून उतरायला लावलं आणि गाडीतील सगळी प्लास्टिकची कव्हरं काढायला लावली. "बापरे! आताच काढ सगळं, असं तो मला म्हणाला," अशाप्रकारे वंदना यांनी राज ठाकरेंच्या स्वभावतील गंमतीशीर पैलू उघड केला.
राज आणि शर्मिला ठाकरे यांच्या लव्हस्टोरीमध्ये वंदना गुप्ते यांचा महत्त्वाचा वाटा
राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांच्याशीही वंदना गुप्ते यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. राज आणि शर्मिला यांची प्रेमपत्र एकमेकांना नेऊन देण्याचं काम वंदना गुप्तेंनीच केलं होतं, अशी एक आठवणही त्यांनी यापूर्वी सांगितली होती. राज आणि शर्मिला यांच्या लग्नापासून ते त्यांच्या खासगी आयुष्यातील काही क्षणांपर्यंत, वंदना गुप्ते नेहमीच त्यांच्या जवळच्या मैत्रिणी राहिल्या आहेत. त्यांच्या या आठवणीतून राज ठाकरे यांचा एक वेगळा, दिलखुलास आणि मिश्किल स्वभाव समोर येतो.