एका प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या मुलीचं निधन झालं आहे. एक हॉटेल रुममध्ये अभिनेत्याची मुलगी मृतावस्थेत आढळली आहे. या घटनेनं अभिनेत्याला खूप मोठा धक्का बसला आहे. त्याच्या कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉमी जोन्सची मुलगी विक्टोरिया जोन्स आज या जगात नाही. एका लग्झरी हॉटेलमध्ये ती मृतावस्थेत आढळली. गुरुवारी मध्यरात्री 3.14 मिनिटांनी तिचा मृतदेह सापडला. NCB हे एरियाच्या माहितीनुसार, गुरुवारी सन फ्रॉन्सिक्सोच्या फेयरमोन्ट हॉटेलमध्ये अभिनेत्याची मुलगी सापडली. तिला रुग्णालयात दाखव केलं असं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
TMZ त्या रिपोर्टनुसार, पीडित विक्टोरिया ही 34 वर्षांची होती. ती ऑस्कर विजेता अभिनेता टॉमी जोन्सची मुलगी होती. तिच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली आहे. तिचा मृत्यू कसा झाला याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याच्या मुलीने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
विक्टोरिया हिनं वडिलांसमोर मेन इन ब्लॅक 2 मध्ये काम केलं आहे. ती 34 वर्षांची होती. पण नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहिली. तिची वडिल टॉमी हे आता 79 वर्षांचे आहेत. त्यांनी आतापर्यंत अंडर सेज, नॅच्युरल बॉर्न किलर्स, द क्लाइंट ओ बॅटमॅन फॉरएवर सारख्या सिनेमांत काम केलं आहे.
