'होमबाऊंड'चं कथानक काय?
'होमबाऊंड' या चित्रपटाचं कथानक मोहम्मद शोएब आणि चंदन कुमार या दोन मित्रांवर आधारित आहे. पोलीस व्हावं अशी या दोघांचीही इच्छा आहे. पण शोएबला धर्मामुळे तर चंदनला जातीमुळे मर्यादा येतात. त्यांचा संघर्ष प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो की, आपल्याला मेहनत आणि चिकाटी फक्त पुरेशी असते का? आपल्या स्वप्नांपेक्षा समाजाने नियम मोठे असतात का? असे अनेक प्रश्न विचारायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे. नीरज घायवान दिग्दर्शित या चित्रपटात ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
advertisement
Horror Thriller Web Series : हादरवणारा क्लायमॅक्स, प्रत्येक एपिसोड धडकी भरवणारा, 'ही' हॉरर -थ्रिलर वेबसीरिज पाहिलीत!
'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
करण जौहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. परदेशातील अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग झालेला हा चित्रपट भारतात 26 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होत आहे.
'होमबाऊंड' ओटीटीवर होणार रिलीज!
'होमबाऊंड' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाईल. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. कान्स 'फिल्म फेस्टिव्हल 2025' मध्ये ‘होमबाउंड’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून नऊ मिनिटांचं स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. सर्वांनी उभं राहून चित्रपटासाठी टाळ्या वाजवलेल्या या या चित्रपटाला ऑस्कर मिळालं अशी भारतीय सिनेप्रेक्षकांची इच्छा आहे.
'ऑस्कर 2026' कधी आहे?
'ऑस्कर 2026' 15 मार्च 2026 रोजी पार पडणार आहे. जगभरातील सिनेप्रेमींसाठी हा एक महत्त्वाचा पुरस्कारसोहळा आहे. ऑस्कर नॉमिनेशनची अधिकृत घोषणा गुरुवारी 22 जानेवारी 2026 रोजी करण्यात येणार आहे.