रिलेशमधील रेड फ्लॅग्सबद्दल बोलताना हृता म्हणाली,"मला असं वाटतं की हे खूप सबजेक्टिव्ह आहे. माझ्यासाठी जे वर्क होईल ते कदाचित इतरांसाठी होणार नाही. प्रेम वगैरे या गोष्टींबाबत मी थोडी ओल्ड स्कूल आहे. प्रामाणिकपणा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा आहे. एखाद्या गोष्टीचा मला अती प्रमाणात राग येतो. तर एखाद्या व्यक्तीवर मी अती जास्त प्रमाणात प्रेमदेखील करू शकते. पण लग्नानंतर मी थोडी समंजस झाले आहे. माझ्यासाठी रेड फ्लॅग म्हणजे प्रामाणिक नसणं, संभाषण नसणं, सर्वांसाठी उपलब्ध असणं, फक्त बोलण्याप्रेक्षा क्रिया होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे".
advertisement
13 वर्षांचा संसार, पदरात 2 मुलं, करोडोंची संपत्ती; सगळं काही आलबेल तरी का झाला करिष्मा-संजयचा डिवोर्स
हृता पुढे म्हणाली,"समोरच्याकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर योग्यवेळी माघार घेणं गरजेचं आहे. कारण प्रेमात सगळेच पडतात पण ते निभावणं कठीण असतं. याबद्दलची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. प्रत्येक दिवशी त्याच व्यक्तीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम करणं गरजेचं आहे. प्रामाणिक आणि सतत बोलतं राहणाऱ्या व्यक्तीसोबत मला संसार थाटायचा होता. लग्न ही खरंतर खूप मोठी जबाबदारी आहे".
हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांचा 'आरपार' हा चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे. कॉलेज तरुणांना या चित्रपटाने चांगलेच आकर्षित केले आहे. खरंतर हा एक सांगितिक चित्रपट आहे. या रोमँटिक चित्रपटात एकूण आठ गाणी आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाचा चांगलाच बोलबाला आहे. गुरुवारी पुणेकरांनी ऑफिस बंक करुन या चित्रपटाचे दोन्ही शो हाऊसफुल्ल केले आहेत.